Dhanashree Verma : चहलची पत्नी धनश्री वर्मासाठी श्रेयस अय्यरने बनवला खास व्हिडिओ; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, हे नाही सुधारणार..

0

Dhanashree Verma : लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा सध्या झलक दिखला जा या डान्स रिॲलिटी शोचा (Jhalak Dikhhla Jaa) भाग बनली आहे. धनश्रीचा डान्स परफॉर्मन्स अनेकजण पसंत देखील करत आहेत. धनश्री वर्मा नेहमी या ना त्याकारणामुळे चर्चेत असते. चहल सध्या भारतीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो आपल्या पत्नीसाठी मात्र इनिंग खेळताना पाहायला मिळत आहे.

झलक दिखला जा या डांस रियलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहचण्यासाठी व्होटिंगची आवश्यकता असते. आपल्या पत्नीला वोट करण्यासाठी आपल्या चाहत्यांना चहलने देखील विनंती केली आहे. चहलची पत्नी एक प्रसिद्ध प्रोफेशनल डान्सर आहे. तिची स्वतःची एक डान्स अकॅडमी देखील आहे. मात्र सध्या ती डान्स रिॲलिटी शोमच्या माध्यमातून आपले नशीब अजमावत आहे. तिचा परफॉर्मन्स अनेकांच्या पसंतीस देखील उतरत आहे.

धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोघांच्या अफेरच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. अनेकदा दोघांना एकत्र प्रवास करताना देखील स्पॉट करण्यात आले होते. दोघांचे एकत्रित डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) घरी धनश्री आणि श्रेयस अय्यर डिनरसाठी पोहोचल्यानंतर, या चर्चांनी अधिक जोर धरलाय होता. चहलच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवच्या घरी श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा कसे? साहजिकच हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

दोघांमध्ये अफेअर असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर धनश्री वर्माने याचे खंडन केले. आम्ही चांगले मित्र असल्याचं तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत सांगितले. त्यांनतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने धनश्रीसाठी खास व्हिडिओ बनवला आहे. खरंतर श्रेयस अय्यर बरोबर मोहम्मद सिराज, शिखर धवन, सूर्यकुमार यादव या तिघांनी देखील ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी धनश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र तिघांपैकी श्रेयस अय्यरने दिलेल्या शुभेच्छा खास आहेत. श्रेयस अय्यर म्हणाला, ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आग लावून टाक, एन्जॉय ब्रो. असं म्हणत धनश्रीला श्रेयस अय्यरने देखील सपोर्ट केला आहे. दिलेल्या या गोड शुभेच्छा सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाल्या आहेत. श्रेयस अय्यरला देखील खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. श्रेयस अय्यरचा हा व्हिडिओ धनश्रीने स्वतः आपल्या अकाउंटवरून पोस्ट केला आहे.

हे देखील वाचा  PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..

Soap for face : तुम्ही देखील चेहऱ्याला साबण लावता? मग हे वाचा आणि तुम्हीच ठरवा काय ते..

Eye Care Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी 20-20-20 फॉर्म्युला लागलीच फॉलो करा; होय अन्यथा येईल अंधत्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.