Abhishek Ghosalkar Case: अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर; मॉरिसने गोळ्या घालून स्वतःलाच का संपवले..
Abhishek Ghosalkar Case : राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धक्कादायकाने घटना घडताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे सरकारमध्ये असणारी लोकच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा वाजवत आहेत. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आमदाराकडून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (abhishek ghosalkar murder case) यांची काल हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्ह सुरू असताना ही घटना घडल्याने देशभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सातत्याने महाराष्ट्रात अशा घटना समोर येत असल्याने, महाराष्ट्र राज्याची बदनामी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. विरोधकांनीही महाराष्ट्राचा बिहार होत असल्याची टीका केली आहे.
दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्यात आला. त्यानंतर फेसबुक लाईव्ह सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाच्या नेत्याची हत्या करण्यात आली. मात्र तरी देखील राज्याचे गृहमंत्री (home minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गांभीर्य नसल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांनी या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा सुरू लावून धरला. यावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गाडीखाली कुत्रं आलं तरी हे गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असं धक्कादायक विधान केलं आहे.
अभिषेक घोसाळकर (abhishek ghosalkar) यांनी हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव मॉरिस नोरोन्हो (Mauris Noronha) असं होतं. काही दिवसांपूर्वी मॉरिस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना देखील भेटले होते. फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर जाण्यासाठी उठले, त्यानंतर समोरून मॉरिसने गोळीबार केला. ज्यामधील तीन गोळ्या गोसाळकर यांना लागल्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःलाही एक गोळी झाडून घेतली, आणि आपलं आयुष्य संपवलं.
मॉरीसने अभिषेक गोसाळकर यांची हत्या का केली, याविषयी पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. दहिसर मधून दोन वेळा अभिषेक नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत निवडून गेले होते. मॉरिस देखील दहिसर मधून स्वतःला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता समजत होता. फेसबुक लाईव्ह दरम्यान दोघांनीही आता यामुढे आम्ही एकत्र येऊन काम करणार असल्याचे म्हटलं होतं. आमच्या एकत्र येण्याने अनेकांना आश्चर्य वाटेल, असे देखील फेसबुक लाईव्ह मधून सांगण्यात आलं होतं.
पोलिसांकडून हत्येचा कारण स्पष्ट करताना वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं सांगण्यात आले आहे. या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. असेही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र अवैद्य होतं. मॉरिसला मुंबई पोलिसांकडूनशस्त्र परवाना देण्यात आला नव्हता. अशीही माहिती आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिसने आत्महत्या का केली, याविषयी माहिती मिळाली नसून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम