IND vs AFG 1St T20: शुभमन की यशस्वी कोण येणार सलामीला? अशी असेल पहिल्या T20 साठी भारतीय प्लेइंग इलेव्हन..

0

IND vs AFG 1St T20: टी-ट्वेंटी मालिकेच्या संघ निवडीनंतर अनेकांना उत्सुकता लागलीय, अकरा तारखेला अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या पहिल्या t-20 सामन्याची. विराट कोहली (Virat kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघेही 2022 पासून एकही टी-ट्वेंटी सामना खेळले नाहीत. एका वर्षाहून अधिक काळ t20 पासून दूर राहिल्याने हे दोघे t20 मध्ये कसे खेळणार, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. चाहते या दोघांचा खेळ पाहण्यासाठी उत्सुकही आहेत.

11 जानेवारीला मोहालीच्या मैदानावर पहिला टी ट्वेण्टी सामना पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून या सुरुवात होईल. अनेक प्रमुख खेळाडू T20 चा भाग नसले तरी, विराट आणि रोहित शर्माची वापसी झाल्यामुळे अनेकांचे या टी-ट्वेंटी सिरीजकडे लक्ष लागलं आहे. आगामी t20 च्या दृष्टीने संघ निवडीकडे देखील अनेकांचे लक्ष आहे. हार्दिक पांड्या (Hardik pandya) सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) या सिरीजचा भाग नसल्याने, टी ट्वेंटी मालिकेत संघ निवड सोपी आहे. मात्र हे दोघे उपलब्ध झाल्यानंतर आगामी वर्ल्ड कपमध्ये मात्र संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.

टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा ओपन करणार असल्याची माहिती आहे. रिंकू सिंहला भारताच्या अंतिम 11 मध्ये संधी द्यायची असेल, तर विराट कोहली आणि रोहित शर्माला सलामीवीरांनी जबाबदारी पार पाडावी लागेल. तरच भारतीय संघ सहा बॉलिंग ऑप्शनशह मैदानात उतरू शकणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सिरीजमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळला तरीही, सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीमुळे रिंकू सिंहला (Rinku Singh) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या t-20 सामन्यात रोहित शर्मा बरोबर यशस्वी जयस्वाल सलामीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर शिवम दुबे/ संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर शिवम दुबे, सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंह आणि सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल अशा प्रकारचा फलंदाजी क्रम घेऊन भारत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

पहिल्या T20 सामन्यात गोलंदाजीची मदार कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार सोबतीला ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि शिवम दुबे असतील. खेळपट्टी विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मैदानावर धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग केला जाऊ शकतो. त्यामुळे टॉस जिंकणार संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणं पसंत करेल.

भारताचा सोळा सदस्यीय संघ…

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान,मुकेश कुमार

 

 

 

हे देखील वाचा IND vs AFG 1st T20I: विराट, रोहितच्या सलामीमुळे जयस्वाल, शुभमन गिलचे T20 करिअर धोक्यात; राहुल द्रविडचा प्लॅन समोर..

India vs Afghanistan T20I: केएल राहुल, ईशान किशन, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर संपुष्टात..

YouTube Income Tips: यूट्यूबच्या पॉलिसीत बदल! आता पैसे कमावणे झाले सोप्पे; जाणून घ्या सर्व निकष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.