IND vs SA 2nd test Live: शुभमन गिलसह या दोन जणांना मिळणार डच्चू; पाहा दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

0

IND vs SA 2nd test Live: उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना मानहानीकारकरित्या गमावल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत मालिका बरोबरीमध्ये सोडण्याचा उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगल्यानंतर आता मालिका वाचवण्याचं आव्हान भारतीय संघापुढे असेल. मात्र त्यापूर्वी अंतिम 11 निवडण्याचे देखील आव्हान रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम मॅनेजमेंट पुढे असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारतीय संघ कागदावर दमदार वाटत होता. मात्र पहिल्याच कसोटीत हा समज दूर झाला. दक्षिण आफ्रिकेचा सामना भारतीय संघ तीन दिवसही करू शकला नाही. अवघ्या अडीच दिवसांमध्ये पहिल्या कसोटीचा निकाल लागला. भारतीय संघ एक डाव आणि 32 धावांनी पराभूत झाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) मोठ्या प्रमाणात टीका झाली. फलंदाज म्हणून रोहित शर्मा अपयशी ठरलाच. मात्र कर्णधार म्हणूनही तो मैदानामध्ये साधारण वाटला, अशीही टीका त्याच्यावर करण्यात आली.

कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठी दुसरा कसोटी सामना महत्वपूर्ण असणार आहे. आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे बोलले जात आहे. मात्र त्यापूर्वी रोहित शर्मा साधारण वाटत असेल, तर रोहित शर्माला पर्याय शोधला जाऊ शकतो. त्यामुळे दुसरा कसोटी सामना रोहित शर्मासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात संघामध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सातत्याने अपयशी ठरलेल्या, प्रचंड साधारण सरासरी असलेल्या शुभमन गिलला (shubman gill) दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसं पाहायला गेलं तर शुभमन गिलची (shubman gill) कसोटी क्रिकेटमध्ये बॅटिंग सरासरी केवळ 31.1 इतकी आहे.

शुभमन गिल ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर अभिमन्यू ईश्वरनला (Abhimanyu Ishwaran) संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. दुसरा कसोटी सामना केपमटाऊनमध्ये होत असल्याने, याही सामन्यात जलदगती गोलंदाजाला मदत राहील. त्यामुळे रविचंद्रन अश्विन खेळताना दिसणार नाही. अश्विन ऐवजी रवींद्र जडेजाला (ravidra jadeja) संधी दिली जाऊ शकते. शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा दोघांनाही दुसऱ्या कसोटीत संधी मिळणार नाही. या दोघांऐवजी मुकेश कुमार आणि आवेश खान यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

भारतीय वेळेनुसार उद्या दोन वाजल्यापासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होईल. टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरत सोडायची असेल, तर भारतीय सलामीवीरांनी आपला खेळ उंचावावा लागणार आहे. बवूमाच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गर कर्णधारपद सांभाळेल. दुसरा कसोटी सामना एल्गरच्या करिअरचा शेवटचा सामना असेल. त्यामुळे आपल्या करिअरचा शेवट मालिका विजयाने करण्यासाठी तो उत्सुकही असेल.

हे देखील वाचा Hit And Run Law: पेट्रोलचा तुटवडा का झाला निर्माण? काय आहे नेमकं प्रकरण वाचा सविस्तर..

Chana Benefits: भाजलेले चणे खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल; जाणून घ्या प्रमाण आणि फायदे..

David Warner: ऑस्ट्रेलिया संघात वादळ! ..म्हणून डेव्हिड वॉर्नरने कसोटी नंतर अचानक वनडेतूनही घेतली निवृत्ती..

Kl Rahul: World Cup पराभवानंतर केएल राहुलचे निवृत्ती विषयी विधान चर्चेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.