विवेक ओबेरॉय यांच्या घरी पोलिसांची धाड
अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या घरी बंगळूर पोलीसांनी काल दुपारी एकच्या सुमारास धाड टाकल्याची घटना घडली आहे.
कर्नाटकचे माजी मंत्री जिवराज अलवा यांचा मुलगा आदित्य अलवा हा कन्नड फिल्म इंडस्ट्रीत कलाकारांना ड्रग्स पुरवत होता. असा त्याच्यावर आरोप आहे.
आदित्य हा विवेक ओबेरॉय यांचा मेहुणा असल्यामुळे तो विवेक ओबेरॉय यांच्या जुहू येथील घरी लपला आहे. अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. आणि त्यामुळेच आमची टीम विवेकच्या घरी दाखल झाली. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
आदित्य हा फरार असून त्याचा शोध आम्ही घेत आहोत. कोर्टाकडून सर्च वॉरंट घेऊनच आमची क्राईम ब्रॅच विवेक ओबेरॉय यांच्या घरी गेली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम