Telangana assembly election: खांबावर चढलेल्या तरुणीवर भर सभेत मोदी ओरडले “तू खाली उतर..,”; तरीही ती चढतच राहिली, पाहा व्हिडिओ..
Telangana assembly election: सध्या पाचराज्याच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचारात उतरला आहे. तेलंगणातील भारतीय जनता पार्टीने आपली ताकद पणाला लावली आहे. तेलंगणामध्ये (Telangana) सिकंदराबाद (Secunderabad) येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा झाली. सभेला संबोधित करत असताना, अचानक एक तरुणी चक्क विजेच्या खांबावर चढली आणि मोठा राडा झाला.
सिकंदराबादमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना जवळ असणाऱ्या विजेच्या पोलवर तरुणी चढली. अचानक नरेंद्र मोदींचे लक्ष विजेच्या पोलवर चढणाऱ्या तरुणीकडे गेले. आपल्या मागण्या घेऊन तरुणीने त्यांना भेटण्यासाठी हे कृत्य केले. तरुणीला समजावताना मोदी म्हणाले, तुझ्या मागण्या स्थानिक नेते पूर्ण करतील. तू खांबावरून खाली उतर. तिथे शॉर्टसर्किट आहे. असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी तरुणीला विनवणी केली.
नरेंद्र मोदी यांनी तरुणीला खाली उतरण्याचे आवाहन करूनही तरुणी आणखी वर चढल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. खाली उतरण्याचे आवाहन करताना नरेंद्र मोदी म्हणाले, बेटा खाली ये, तुझ्या असं वागण्याने काहीही लाभ होणार नाही. मी तुझं सगळं ऐकून घेतो. मी तुझ्यासाठी इथे आलो आहे.
#WATCH | Secunderabad, Telangana: During PM Modi's speech at public rally, a woman climbs a light tower to speak to him, and he requests her to come down. pic.twitter.com/IlsTOBvSqA
— ANI (@ANI) November 11, 2023
काही स्थानिक नेत्यांनी विनंती केल्यानंतर, तरुणी खाली उतरली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येतो. अगदी लोकांना काळे कपडे परिधान करण्यावर देखील बंदी घालण्यात येते. मात्र काल सिकंदराबादमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांच्या सभेत हा प्रकार पहिल्यांदा घडल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हे देखील वाचा Sleeping Positions And Relationship: नात्याची पोलखोल करतात झोपण्याच्या या पाच पद्धती; जाणून घ्या झोप आणि नात्याचा थेट संबंध..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम