Chanakya quotes: विशी ओलांडल्यानंतर चुकूनही करू नका ही चूक, अन्यथा जिवंतपणी भोगाल त्या सगळ्या यातना..
Chanakya quotes: आयुष्य (life) हे प्रचंड मौल्यवान आहे. ते कसं खर्चिक घालायचं, हे तुमच्या हातात असतं. खास करून विशी ओलांडल्यानंतर, जीवनाविषयी तुम्ही गांभीर्यतीने विचार करणं फार आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही वीस वर्षाच्या आतमध्ये असता, तेव्हा तुमच्या चुकांना अनेक जण माफही करतात. मात्र विशी ओलांडल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याला सुरुवात होते.
आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी देखील वीस वर्षानंतर तरुणांनी काय करावे, आणि काय करू नये? याविषयी आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथांमध्ये सविस्तर मांडणी केली आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, जेव्हा तरुण वीस वर्ष पूर्ण करतो. तेव्हा त्याच्यामध्ये खूप काही करण्याची धमक असते. तरुण रक्त असल्याने त्याच्या हातून अनेक चुकाही घडू शकतात. त्यावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.
तरुणाने वीस वर्ष पूर्ण केल्यानंतर, त्याने आपल्या वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. वेळ बिलकुल ही वायफळ जाता कामा नये. रोज रोज काहीतरी नवीन उपयोगी गोष्टीची उकल करून घेणे आवश्यक आहे. वयाच्या विसाव्या वर्षानंतर, पैसा आपल्याकडे कसा येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. पैशाचे महत्व या वयात समजले नाही, तर आयुष्यभर समजणार नाही.
चाणक्य सांगतात, तरुणांनी या वयात नवनवीन लोकांशी भेटणं, संपर्क वाढवणे फार आवश्यक आहे. समाजात वावरत असताना, तुम्ही या वयात आक्रमक असता. मात्र नम्र राहणं तुमच्यासाठी प्रचंड लाभदायक ठरतं. लोकांशी नम्रतेने संवाद साधल्याने लोकं तुम्हाला अनेक चांगले उपदेश, मदत करतात. ज्याचा तुमच्या आयुष्याशी थेट संबंध असतो.
आचार्य चाणक्य सांगतात, विशी ओलांडल्यानंतर पैशाचे महत्व तुमच्यामध्ये येणे फार आवश्यक आहे. पैसा खर्च करताना प्रचंड विचारपूर्वक खर्च करायला हवा. रागावर नियंत्रण ठेवायला हवे. आळस खूप मोठा शत्रू आहे. कुठल्याही कामात तत्परता असणे आवश्यक आहे. आजचं काम कधीही उद्यावर ढकलू नका. रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्ही वरील सर्व गोष्टी वेळेत केल्या नाहीत, तर पुढे आयुष्यभर तुम्हाला पश्चातापाशिवाय दुसरा काहीही पर्याय नसेल. वेळ कधीही कोणासाठी थांबलेली नाही. वेळेनुसार तुम्ही बदलत गेला नाहीत, वेळेनुसार तुम्ही तुमचे आयुष्य जगला नाही, तर खूप उशीर होतो. आणि मग जिवंतपणी तुम्हाला खूप साऱ्या यातनांना सामोरे जावे लागते.
हे देखील वाचा RAILTEL Recruitment: पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी; लगेच करा असा अर्ज..
ENG vs SL: इंग्लंड अधिकृतरित्या बाहेर! श्रीलंकेच्या विजयाबरोबरच स्पष्ट झाले चार सेमी फायनललिस्ट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम