AUS vs IND: Virat Kohli च्या आरामाचे आकडे पाहून तुमचेही डोळे फिरतील; का दिला जातोय विराटला आराम..

0

AUS vs IND: अशिया कप (Asia Cup 2023) जिंकल्यानंतर भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये विश्वचषक होणार असल्याने, भारतीय संघाकडून विश्वचषक (world Cup 2023) जिंकण्याची आशा अनेकांना लागून राहिली आहे. भारतीय संघात अनेक स्टार खेळाडू असल्याने, अनेकांचे लक्ष भारताच्या कामगिरीकडे लागले आहे.

एकीकडे भारतीय संघ विश्वचषकात कशी कामगिरी करतो, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे विराट कोहलीच्या परफॉर्मन्सकडे देखील अनेकांचे लक्ष आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये विराट कोहलीला (Virat kohli) एकदिवसीय क्रिकेट मधून देण्यात आलेल्या विश्रांतीची आकडेवारी पाहून क्रिकेट चाहते म्हणून, तुम्हाला आश्चर्य चकित करणारी आहे.

भारताच्या t20 संघातून वगळल्यानंतर विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमधून देखील मोठ्या प्रमाणात आराम दिला गेला. विराट कोहलीला दिलेली विश्रांती भारतीय संघासाठी दोखेदुखी देखील ठरू शकते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 22 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. मार्चपासून विराट कोहली भारतात एकही एकदिवसीय सामना खेळला नाही.

यापूर्वी भारतामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सिरीजमध्ये विराट कोहली खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय सिरीजमध्ये विराट कोहली खेळला. मात्र या सिरीजमध्ये विराट कोहली अपयशी ठरला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी मालिका विराटसाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

वर्ल्डकप पूर्वी भारताचे प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये असणे फार आवश्यक आहे. मात्र संधी असून देखील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत रोहित शर्मा (rohit sharma) विराट कोहली, आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या तीन प्रमुख फलंदाजांना पहिल्या दोन सामन्यात विश्रांती देण्यात आली. पाठीमागच्या नऊ एकदिवसीय सामन्यात विराट कोहली केवळ तीन एकदिवसीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने एक दमदार शतकही ठोकलं आहे.

हे देखील वाचा IND vs AUS: त्या तिघांना संधी मिळण्यासाठी विराट, रोहित, हार्दिकला विश्रांती; पण खरचं तिघे World Cup 2023 खेळतील..

WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..

IND vs AUS ODI series: विराट, रोहित, हार्दिकच्या विश्रांतीचा निर्णय भोवणार; Asia Cup मध्ये उणीवा भरून निघाल्या, पण आता स्वतः च खोदला मोठा खड्डा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.