Walk Benefits: निरोगी हृदयासाठी दिवसभरात किती चालावे? जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत आणि फायदे..

0

Walk Benefits: धावपळीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य (healthy health) ठेवणं अलीकडच्या काळात मोठं आव्हान आहे. धावपळ आणि कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे लक्ष देणे अनेकांना शक्य होत नाही. जिमला जाणं तर खूप लांबची गोष्ट आहे. हे सगळं वास्तव असलं तरीदेखील तुम्हाला निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर शरीराकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. अनेक जण संध्याकाळी जेवण केल्यानंतर, तसंच सकाळी देखील काही वेळ चालून निरोगी आरोग्य ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, निरोगी आरोग्य ठेवायचं असेल तर, दिवसभरात कसं आणि किती चालणं आवश्यक आहे? (Walking is important for health)

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, तर तुम्हाला चालण्यावाचून पर्याय नाही. नियमीत चालण्याचे आरोग्य संबंधी अनेक फायदे आहेत. नियमीत चालल्याने हृदयाच्या समस्या दूर होतात. शरीरामधील रक्तभिसरण प्रक्रिया देखील सुरळीत काम करते. या सगळ्या गोष्टी अनेकांना माहिती असल्या तरी देखील दिवसभरात नक्की किती चालले पाहिजे? आणि चालण्याची योग्य पद्धत काय? याविषयी अनेकांना अचूक माहिती नसल्याचे लक्षात येते. आणि म्हणून, आज आपण दिवसभरात किती चालायला हवं? आणि एकंदरी चालण्याची पद्धत काय असायला हवी? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

एका दिवसात किती चालले पाहिजे?

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण सकाळी आणि संध्याकाळी देखील चालतात. मात्र निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर किती चालायला हवं? याचे काही नियम देखील आहेत. नॅशनल हेल्थ सर्विसच्या म्हणण्यानुसार, कमीत कमी तुम्ही 140 ते 150 मिनिट चालले पाहिजे. म्हणजेच तुम्ही दिवसभरात अडीच तास चालणे आवश्यक आहे. मात्र सविस्तर अहवाल सादर करताना नॅशनल हेल्थ सर्विसने दिवसभरात दहा हजार पावले चालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सकाळी संध्याकाळी किमान एक तास चालण्याला कोणताच पर्याय नाही.

चालण्याची योग्य पद्धत?

दिवसभरात किती चालावे? याबरोबरच चालण्याची योग्य पद्धत देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. चालायला सुरुवात करताना, प्रथम वेग कमीच असायला हवा. सुरुवातीला पंधरा मिनिटे तुम्ही एक संथ हळुवारपणे चालणे आवश्यक आहे. त्यांनतर तुम्हाला शक्य होईल, त्या गतीने तुम्ही चालू किंवा धावू शकता.

चालताना किंवा धावताना नेहमी डोकं वर काढून चालणे आवश्यक आहे. चालताना किंवा लावताना तुमची मान, खांदे सैल ठेवणे आवश्यक आहे. हे करत असताना तुम्ही पुढे किंवा मागे वाकणे योग्य नाही. शिवाय धावताना किंवा चालताना तुम्ही मागे देखील पाहणे योग्य नाही. धावताना किंवा वेगाने चालताना नेहमी पाठ सरळ ठेवणे आवश्यक असते.

वेगाने चालण्याची योग्य वेळ? 

वेगाने चालताना किंवा धावताना तुम्ही योग्य वेळेची निवड करणे आवश्यक असते. जर तुम्हाला रनिंग किंवा वेगाने चालायचं असेल, तर तुम्ही चुकूनही उष्णता जास्त असतानाची वेळ निवडू नये. रनिंग किंवा वेगाने चालायचं असेल, तर तुम्ही सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडायची आहे. जास्त उष्णतेमध्ये धावल्याने दम लागतो. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता देखील भासते. म्हणून वेगाने चालायचं असेल, तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी या दोन वेळा निवडू शकता.

हे देखील वाचा Chanakya Niti: जीवनात या दोन गोष्टी नेहमी गुप्त ठेवा, अन्यथा याल रस्त्यावर..

Sonalika tiger Electric tractor: जबरदस्त वैशिष्ट्यांसह सोनालिकाने लॉन्च केला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; किंमत फक्त इतकी..

Relationship Tips: कमी वेळेत पार्टनरला संतुष्ट करायचंय? जाणून घ्या संबंधाचा हा फंडा..

Railway Recruitment 2023: दहावी आणि ITI झालाय? मग रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.