Valentine: यंदा व्हॅलेंटाईनला गुलाब नाही, या वस्तुची झाली रेकॉर्डब्रेक विक्री; जाणून तुम्हीही व्हाल हैराण..

0

Valentine: जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. जगभरातील लोक हा दिवस मोठ्या उत्साहाने आपापल्या पद्धतीने साजरा करत असतात. ७ फेब्रुवारी पासून व्हॅलेन्टाईन आठवडा (valentine week) सुरू होतो. यामध्ये रोज डे हा दिवस देखील साजरा केला जातो. साहजिकच या दिवशी गुलाबाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र या वर्षीच्या व्हॅलेन्टाईनला धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुलाब (rose) पेक्षा जास्त अशा एका वस्तूंची विक्री झाली आहे जे जाणून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल.

व्हॅलेन्टाईनमध्ये गुलाबाला विशेष महत्व आहे. म्हणूनच व्हॅलेन्टाईन आठवड्यामध्ये रोज दे अर्थात गुलाब दे म्हणून साजरा देखील केला जातो. या दिवशी गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. प्रियकर प्रेयसी (Love birds) एकमेकांना या दिवशी गुलाबाचे फुल प्रामुख्याने भेट देत असतात. म्हणून व्हॅलेंटाइनच्या आठवड्यात गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या आठवड्यात गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी देखील यावर्षी गुलाबा पेक्षा कंडोमची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ७ तारखेपासून हा व्हॅल्नेटाईन आठवडा सुरू होतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व आहे. यामध्ये टेडी डे, चॉकलेट डे, प्रपोज डे रोज डे असे अनेक डे साजरे केले जातात. दरवर्षी व्हॅलेंटाईन आठवड्यात गुलाबाची भरपूर फुले विकली जायची. मात्र, यंदा गुलाब फुलांच्या तुलनेत कंडोमची रेकॉर्डब्रेक विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या व्हॅलेन्टाईनला झालेल्या कंडोम विक्रीचे आकडे पाहून सर्वांनाच धक्का बसेल. जागतिक बाजारपेठेत कंडोमची खूप मोठ्या प्रमाणत विक्री झाली आहे.

ऑनलाइन सामान वितरण कंपनी ब्लिंकिटचे संस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी सांगितल्याप्रमाणे, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कंडोम आणि मेणबत्त्या या दोन्हींच्या विक्रीत वाढ झाली आहे. तर इतर उत्पादनांमध्ये पुरुषांसाठी डिओडोरंट, महिलांसाठी परफ्यूम, सिंगल गुलाब, पुष्पगुच्छ आणि चॉकलेट्स यांचा देखील समावेश आहे. नॉर्थ आयलँड आणि न्यूझीलंडमध्ये सुपरमार्केट चालवणाऱ्या फूडस्चेटफचे ३३० दुकाने आहेत. सोबतच २४,००० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. त्यांच्या एका अहवालानुसार, यावर्षी संपूर्ण व्हॅलेंटाईन आठड्यामध्ये गुलाब आणि भेटवस्तूंपेक्षा कंडोमची अधिक विक्री झाली.

कंडोम बरोबरच यावर्षी पर्सनल लुब्रिकेंट विक्रीत देखील ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजेच, २०२२ च्या तुलनेत यंदाच्या व्हॅलेंटाईन आठवड्यात कंडोमच्या विक्रीत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईन डेने अनेकांना हैराण केले आहे. ‘यूएस नॅशनल रिटेल फेडरेशन’च्या म्हणण्यानुसार, व्हॅलेंटाइन डेबद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तसेच लैंगिक संबंधांमुळे होणारे आरोग्य आणि आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १३ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कंडोम दिवस देखील साजरा केला जातो.

पाश्चात्य देशांमध्ये कंडोम बनवणाऱ्या कंपन्या यासाठी विशेष तयारी करतात. या दिवसाचे महत्त्व आणि मागणी पाहता, कंडोमची विक्री चांगली व्हावी. याकरिता व्हॅलेंटाईन डेच्या आधी अनेक प्रकारच्या ऑफर्सही बाजारात आणल्या जातात. हा दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी केले जातात. यामुळे पाश्चात्य देश आधीच बाजारात कंडोम मोठ्या प्रमाणात उपलब्ध करतात. एका अहवालानुसार, यावर्षी थायलंडने सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी, किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी, लैंगिक संक्रमित रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सुमारे ९ कोटी कंडोम लोकांना वाटले आहेत.

हे देखील वाचा Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर जीवघेणा हल्ला, दांडक्याने दोन गटात मारामारी, गाडीचाही चुरा, पाहा व्हिडिओ..

Hug Day: मित्र आणि जोडीदाराला मारलेल्या मिठीतला हा फरक माहीत असायलाच हवा अन्यथा गमवाल..

Relationship Tips: या प्रकारच्या पुरुषांवर महिला टाकतात जीव ओवाळून; नातेसंबंध जोडण्यास असतात कायम तयार..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

Health Tips: जाणून घ्या एक महिना साखर खाल्लीच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील..

Beer Benefits: बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.