butterfly yoga: हे योगासन केल्यास विवाहित पुरुषांना होतात हे जबरदस्त फायदे; जाणून तुम्हीही कराल सुरू..
butterfly yoga:: निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासन करणे फार आवश्यक आहे, याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. खासकरून धावपळीच्या या युगात तंदुरुस्त आरोग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र तरी देखील अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मग अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नियमित योगासने आणि व्यायाम करण्याचे फायदे कोणालाही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र विवाहित पुरुषांसाठी असे एक योगासन आहे, ज्याचा फार मोठा फायदा विवाहित पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी होतो. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत.
पती-पत्नीचे आयुष्य आनंदी आणि सुंदर बनवायचं असेल, तर इतर काही गोष्टींबरोबरच लैंगिकतेचा देखील खूप महत्वाचा रोल आहे. एका सर्वेक्षणात लैंगिक आरोग्य उत्तम असेल, तर पती-पत्नीचं नातं अधिक सुंदर आणि आनंदी असतं. अशी माहिती समोर आली होती. लैंगिक समस्येला अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी, वेळेवर निरोगी आहार आणि नियमित व्यायाम हे देखील महत्त्वाचं कारण आहे. जर तुम्हाला अशा काही समस्या असतील, किंवा लैंगिक आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल, तर तुम्हाला ‘बटरफ्लाय योगासन’ करणे फार आवश्यक आहे. आज आपण बटरफ्लाय योगासनचे काय फायदे आहेत? ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
कोणतेही योगासन असो, आपल्या शरीराला त्याचा खूप मोठा फायदा होतो. मात्र बटरफ्लाय असे योगासन आहे, ज्याचा फायदा पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. फक्त पुरुषाच्याच नाही, तर महिलांच्या लैंगिक समस्या देखील दूर होतात. आरोग्य विषयक अनेक तज्ञ आपल्याला योगासने करण्याचा सल्ला देत असतात. नियमित योगासन करण्याचा दुहेरी फायदा अनेकांना माहिती असेल, योगासन शरीराबरोबरच मनाला देखील सकारात्मक ठेवण्याचं काम करते. बटरफ्लाय योगासनामुळे दिवसभर आपलं मन आणि शरीर फ्रेश राहतं. याशिवाय लैंगिक आरोग्यासाठी देखील हे योगासन उपयोगी आहे, जाणून घेऊया सविस्तर. सर्वप्रथम आपण Butterfly Yoga कसा करावा हे जाणून घेऊ.
असा करा Butterfly Yoga
या योगासनाच्या नावावरूनच हे योगासन कसं केलं जात असेल, याचा अंदाज तुम्हाला आला असेल. तर बटरफ्लाय हे योगासन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही जमिनीवर काहीतरी पसरणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही खाली बसून घ्यायचे आहे. खाली बसून झाल्यानंतर, तुम्ही तुमचे दोन्हीं पाय गुडघ्यात वाकवून तुमच्या पेल्विसपाशी आणायचे आहेत. दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना चिटकवल्यानंतर, तुम्ही फुलपाखरू ज्याप्रमाणे आपले पंख हलवत तसंच तुमचं दोन्ही पाय जमिनी बरोबर हलवायचे आहेत. अशा प्रकारे हे योगासन करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता.
हे योगासन पुरुषांसाठी वरदान
महिलांच्या तुलनेत हे योगासन पुरुषांसाठी अधिक फायदेशीर आहे. याचा अर्थ महिलांना याचा फायदा नाही असं नाही. मात्र पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी या योगासनाचा खूप मोठा फायदा होतो. या योगासनामुळे शरीरामधील रक्तभिसरण व्यवस्थितरित्या होण्याचे काम होते. हे योगासन नियमित केल्याने लवकर येणार थकवा दूर होतो. हे योगासन पुरुषांचा स्टॅमिना वाढवण्याचे काम करते.
बटरफ्लाय हे योगासन नियमित केल्याने शहरांमधील असणारी रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्याचे काम होते. याबरोबरच आपल्या मांड्यांचे स्नायू या योगासनामुळे उत्तमरीत्या होतात. मांड्यांबरोबरच गुडघेदुखीचा त्रास देखील या योगासनाच्या माध्यमातून दूर होतो. एकंदरीत या योगासनाचा महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक फायदा होतो. पुरुषांच्या लैंगिक समस्या हे योगासन नियमित केल्याने नाहीशा होतात.
हे देखील वाचा Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.