Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..
Cardless Withdrawal: डिजिटल आणि कॅशलेसच्या digital and cashless) युगात आता अनेकांकडे एक रुपयाही कॅश नसला तरी, काहीही अडचण येत नाही. अलीकडच्या काळात ‘एटीएम कार्ड’द्वारे (ATM card) एटीएम मशीन ATM machine) मधून पैसे काढण्याची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. अनेकांना एटीएम कार्ड खिशात बाळगायला आवडत नाही. किंवा बाहेर जाताना अनेकांच्या एटीएम कार्ड घेऊन जायचं लक्षात राहत नाही. जर तुम्हाला देखील या अडचणी येत असतील, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण आता एटीएम कार्ड शिवाय एटीएम मशीन मधून पैसे काढता येणार आहेत. आज आपण याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.
RBI ने जारी केलेल्या नवीन नियमानुसार, आता तुम्हाला एटीएम मशीन मधून एटीएम कार्ड शिवाय पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे आता सहाजिकच ज्यांचं कार्ड हरवलं आहे, किंवा खराब झालं आहे, अशांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यापूर्वी एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डचा वापर करावा लागत होता. आरबीआयच्या आदेशानुसार, देशातील सर्व एटीएम मशीन आधुनिक पद्धतीच्या आणि अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या आदेशानंतर, देशातील अनेक एटीएम मशीन अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तयार देखील केल्या गेल्या आहेत. आता ग्राहकांना या एटीएम मशीनमधून पैसे विड्रॉल करता येणार आहेत.
एटीएम मशीन मधून एटीएम कार्ड शिवाय पैसे काढता येणार असले तरी, त्यासाठी एटीएम मशीन अपग्रेड केलेली असणं आवश्यक आहे. ‘एटीएम मशीन’मध्ये जर UPI सर्विस उपलब्ध नसेल, तर तुम्हाला ‘कार्ड’शिवाय एटीएम मशीन मधून पैसे काढता येणार नाहीत. ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. आरबीआयच्या आदेशानुसार आता देशभर एटीएम मशीन अपडेट केला जात आहेत, मात्र तुम्ही जर खेडेगावात राहत असाल, तर त्या ठिकाणी अजूनही यूपीआय सर्विस एटीएममध्ये अवेलेबल नसलेलं पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
मात्र ज्या एटीएम मशीनमध्ये UPI सर्विस अवेलेबल असेल, तर तुम्हाला पैसे काढता येणार आहेत. यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. एटीएम मशीनमध्ये यूपीआय सर्विस अवेलेबल असेल, मात्र तुमचा फोनमध्ये UPI पेमेंट ॲप जसं की, Paytm, PhonePay, Google pay, इत्यादी UPI पेमेंट ॲप नसेल तरी देखील तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. आता आपण एटीएम कार्ड शिवाय एटीएम मशीन मधून पैसे कसे काढायचे? हे सोप्या भाषेत सविस्तर समजून घेऊ.
या पद्धतीने कार्ड शिवाय ATM मशिनमधून काढा पैसे
जर तुमच्याकडे कार्ड नाही, आणि तुम्हाला एटीएम मधून पैसे काढायचे आहेत, तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या एटीएम मशीनमध्ये युपीआय सर्विस अवेलेबल आहे, अशा एटीएम मशीनमध्ये जायचं आहे. एटीएम मशीनमध्ये गेल्यानंतर, सर्वप्रथम तुम्हाला Cash Withdrawal हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या एटीएमच्या स्क्रीनवर UPI हा पर्याय दिसेल, तुम्हाला तो निवडायचा आहे. तुम्ही UPI हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या एटीएमच्या स्क्रीनवर QR Code दिसणार आहे. QR Code दिसल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मधील UPI App उघडायचं आहे. UPI App उघडल्यानंतर तुम्हाला QR Code स्कॅन करायचा आहे.
QR Code स्कॅन केल्यानंतर, आता तुम्हाला जेवढे पैसे एटीएम मशीन मधून काढायचे आहेत, तेवढी रक्कम तुम्हाला टाकायची आहे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे एकाच वेळी पैसे काढण्याची मर्यादा ही पाच हजार रुपये ठेवण्यात आली आहे. आता तुम्ही तुम्हाला हवी असलेली रक्कम टाकल्यानंतर, तुमचा युपीआय पिन टाकावा लागणार आहे. युपीआय पिन टाकल्यानंतर, तुम्हाला ‘प्रोसेस’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
हे देखील वाचा LPG GAS SUBSIDY: फक्त याच गॅस धारकांना मिळणार २०० रूपये अनुदान; तुम्हीही घेऊ शकता लाभ, अशी करा नोंदणी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम