Dharmaveer Movie Review: आनंद दिघेंना जिवंत करणारा ‘धर्मवीर’

0

Dharmaveer Movie Review: अक्षय भुजबळ- ‘यतो धर्म: | ततो: जयः||’ अर्थात जिथे धर्म आहे, तिथे विजय आहे.हे ब्रीद अंगाशी बाळगून आपले आयुष्य समाजासाठी खर्ची करणाऱ्या धगधगत्या अग्नीकुंडाची कहाणी म्हणजे ‘धर्मवीर’. रिव्ह्यूच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो, कथेची सुरुवात कशी होते आणि त्याचा शेवट काय होतो याबाबत मी भाष्य करणार नाही, मात्र चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांवर कथा काय परिणाम करते याबाबत नक्की बोलेल.

‘भगवा दारात, तर हिंदुत्व घरात’ ही बाब उराशी बाळगून काम करणाऱ्या आनंद दिघेंचा (Anand dighe) प्रवास खडतर होता त्याहूनही खडतर होत तो पडद्यावर मांडणं. लोकप्रियता, राजकारण आणि वाद याची किनार असूनही त्यांचे कार्य प्रेक्षकांपर्यंत सहजतेने पोहचवण्याचं काम ‘धर्मवीर’ (dharmveer) करतो.

साध्या आणि सोप्या शब्दातील प्रवीण तरडे (Pravin tarde) यांनी लिहिलेले संवाद प्रेक्षकांना चांगलेच लक्षात राहतात. पुणेरी पाहुण्यांना मारलेला टोमणा असो, की ‘अनाथांचा लोकनाथ’ हो असे सांगणारे शब्द काळजात घर करून जातात. प्रसाद ओक यांनी याआधी अनेक दर्जेदार कलाकृती सादर केल्यात, परंतु या चित्रपटानंतर प्रत्येक जण त्यांना आनंद दिघे म्हणूनच ओळखेल असं वाटतं. हुबेहूब दिसण असो किंवा तेज तराररररर..संवादफेक प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्यात जणू दिघे संचारलेत असच वाटतं.

नजरेने राग व्यक्त करणारे दिघे किंवा रुग्णालयात मृत अवस्थेत पडून असलेले दिघे हे पाहिल्यावरच प्रसाद ओक या व्यक्तिमत्वाशी किती एकरूप झालेत हे समजत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रुपी क्षितिज दातेनी दिलेली अभिनयाची साथ तितकीच महत्वाची वाटते. शांत आणि कमी डायलॉग असलेला एकनाथ प्रेक्षकांना भावूक करून जातो. पत्रकाराच्या भूमिकेतील मंगेश देसाई अवघ्या दोन डायलॉगमध्ये ही सगळ्यांच्या लक्षात राहतो.

मुळशी पॅटर्न प्रमाणेच वर्तमानातून भूतकाळा आणि पुन्हा वर्तमानकाळ दाखवण्यात चित्रपटाचा स्क्रीनप्ले प्रेक्षकांची नजर पडद्यावरून हटू देत नाही. ॲक्शन असो वा इमोशन VFX च्या उत्तम वापरामुळे चित्रपट आणखी भव्यदिव्य वाटतो. उत्तम कास्टिंग प्रमाणेच आनंद दिघे आपल्याला हवा असलेला उमेदवार बाळासाहेब ठाकरेंकडून कसा वदवून घेतात आणि बाळासाहेबांनाही त्यांच्या मनातलं बरोबर कसं कळतं ही केमेस्ट्री दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच यश पूर्णतः प्रेक्षकांच्या डोक्यात बिंबवते.

‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी,अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’ या गाण्याचा सुरुवातीपासून केलेला वापर न बोलताही बरच काही सांगून जातो. चित्रपटात कृष्ण आणि अर्जुनाची दाखवलेली फ्रेम असो किंवा दरवाजावर लावलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असो सर्व काही वास्तवदर्शी साकारल्याने 2-3 ड्रामॅटिक सीनही सहजतेने प्रेक्षकांच्या पचनी पडतात.

‘सामर्थ्य शक्तीचा राजदंड, उचलूनी गर्जना करी प्रचंड, अन्याय फोडण्या वाघ होऊनी भिडला’, संगीतबद्ध केलेली ही शब्द रचना अंगावर अक्षरशः शहारे आणते. हुंकार भरलेल्या ‘असा हा धर्मवीरररररर….’ या तीन शब्दांनी तर धगधगत्या अग्निकुंडाची दाहकता आणखी तीव्रतेने जाणवते. बॅकग्राऊंडमध्ये असलेले छोटे छोटे इफेक्टही कमालीचे प्रभावशाली वाटतात.

कायद्याची चौकट मोडून गरिबांना न्याय देणारा व्यक्ती देव कसा बनतो यापेक्षाही राख्या बांधायला आलेल्या महिलांमध्ये उभ्या असलेल्या सख्ख्या बहिणीलाही नंबर नुसारच राखी बांधून देणारा अवलीया मनाला अधिक भावतो. ‘समुद्राच्या नशिबात माझं ठाणं नाही’ हे सांगणाऱ्या आनंद दिघे यांना ‘धर्मवीर’ सिनेमा खरंच पुन्हा जिवंत करतो. थिएटरमध्ये जाऊन एकदा नव्हे तर वारंवार बघा…

हे देखील वाचा Sarsenapati Hambirrao: युद्धात झालेल्या जखमे सारखा देखना दागिना नाही, फक्त हा दागिना छातीवर पाहिजे, थरकाप उडवणारा ट्रेलर लाँच..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

आपल्या नवऱ्याला जीवे मारण्यासाठी पत्नीनेच रचला डाव, शेवटी असा झाला उलगडा..

Sharad Pawar: खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड.. केतकीने केलेली विकृत कविता वाचून तुमचाही होईल संताप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.