BRO Recruitment:10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर..
BRO Recruitment: बेरोजगारीच्या दुनियेत नोकरी मिळवणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. कोरोणा काळात दोन वर्ष अनेकांना घरातच बसून राहावं लागलं. फक्त एवढंच नाही, तर अनेकांना या काळात चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. मात्र आता अनेक कंपनी आणि सरकारी नोकरी संदर्भात भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे. आता सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) क्षेत्रात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
आता सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) या क्षेत्रात विविध पदांसाठी केली जाणारी भरती ही इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना सीमा रस्ते संघटनच्या (Border Roads Organisation BRO अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२२ ठेवण्यात आली आहे. तसेच ही भरती प्रक्रिया १२९ जागांसाठी घेण्यात येणार आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.
सीमा रस्ते संघटनकडून येणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत ड्राफ्ट्समन / Draughtsman साठी ०१ जागा असणार आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन वर्षाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
सीमा रस्ते संघटनकडून घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत ‘स्टेनो बी’ या पदाच्या ०३ जागा भरण्यात येणार आहेत. ‘स्टेनो बी’ या पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी आणि बारावी पन्नास टक्क्याहून अधिक मार्काने उत्तीर्ण होणे, आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांकडे टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, स्’टेनोग्राफी’मध्ये प्रति मिनिट ८० शब्दांचा वेग तुमच्या टायपिंगमध्ये असणे आवश्यक आहे.
सीमा रस्ते संघटनकडून येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठी एलडीसी( LDC) पदांचा २५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डतून उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण होणे, आवश्यक आहे. तसेच ३५wpm इंग्रजी आणि हिंदीमध्ये ३० wpm टायपिंगची गती असणे आवश्यक आहे.
सीमा रस्ते संघटनकडून येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठी एसकेटी (SKT) या पदासाठी ०३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे,१२ वी उत्तीर्ण. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच स्टोअर करून ठेवण्याचे ज्ञान आवश्यक आहे. ऑपरेटर कम्युनिकेशन (Operator Communication) या पदासाठी ०२ जागा भरण्यात येणार आहेत. या पदाच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ITI कडून वायरलेस ऑपरेटर तसेच रेडिओ मेकॅनिक कोर्सेसचे प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
पर्यवेक्षक सिफर (Supervisor Cipher) या पदासाठी एक जागा भरण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता विज्ञानातील पदवी आणि Class I अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
MSW नर्सिंग असिस्टंट ( MSW Nursing Assistant) या पदासाठी ०९ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणे, आवश्यक आहे. यात तुम्ही बायोलॉजी या विषयात पन्नास गुण मिळवणे आवश्यक आहे.
डीव्हीआरएमटी(DVRMT) २४ जागा, वेह मेक (Veh Mech) १२ जागा, इलेक्ट्रीशियन (Electrician) ०३ जागा, टर्नर (Turner) एक जागा, वेल्डर(Welder) एक जागा, एमएसडब्ल्यू डीईएस(MSW DES) २३ जागा, एमएसडब्ल्यू ब्लॅक स्मिथ (MSW Black Smith) २३ जागा, एमएसडब्ल्यू कुक ( MSW Cook) ०५ जागा, एमएसडब्ल्यू मेस वेटर(MSW Mess Waiter) एक जागा, एमएसडब्ल्यू (MSW Painter) ०१ जागा अशा प्रकारे या भरतीचे स्वरूप असणार आहे. यासाठी उमेदवारांची मान्यताप्राप्त मंडळांकडून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या पदासाठी वयो मर्यादा आणि पगार किती?
या भरतीसाठी उमेदवारांचे वय१८ ते ३० या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा १८ हजार ते ५६ हजार रुपये देण्यात येणार आहे.
उमेदवार http://www.bro.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. तसेच या भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा
या पत्त्यावर अर्ज पाठवा
Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.
हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी;असा करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम