वराला लग्नमंडपात पोहचायला उशीर झाला म्हणून, वधुपित्याने दुसऱ्याच मुलासोबत लावले लग्न; गडी ओल्या हळदीने गेला घरी पण..

0

लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. लग्न व्हायच्या अगोदर अनेक जण आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याविषयी स्वप्न रंगवत असतात. लग्न प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न जमल्यापासून ते लग्न होईपर्यंत मुलगी आणि मुलांमध्ये देखील वेगळाच उत्साह असतो. अलीकडच्या काळात लग्न जमल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटून समजून घेण्याचा प्रयत्न देखील करताना आपण पाहतो. त्यामुळे सहाजिकच लग्नाअगोदरच एकमेकांची मनं जूळलेली पाहायला मिळतात.

पूर्वी लग्न झाल्यानंतरच नवरा आणि नवरी एकमेकांना पाहायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. लग्नाअगोदरच पती-पत्नी दोघेही एकमेकांना बर्‍यापैकी ओळखू लागतात, समजून देखील घेतात. मात्रसिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका लग्नामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. आपण नेहमी पाहतो, खासकरून खेडेगावात लग्न वेळेवर कधीही लागत नाहीत.

नवरदेवा कडील वऱ्हाडी मंडळी पारंपारिक वाद्य किंवा डीजेच्या समोर नाचताना आपण पाहतो, या मंडळींना किती वेळ नाचावं, याचं देखील भान राहत नाही. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना लग्नाची वेळ झाली आहे, असं सांगण्यासाठी काही ज्येष्ठ मंडळी देखील ठेवावी लागतात. मात्र तरीदेखील लग्नाला उशीर व्हायचा तो होतोच. आता यासंदर्भातील एक विचित्र घटना समोर आली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या लग्नामध्ये नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळी नवऱ्या मुलासोबत खूप उशिरा मंडपात पोहोचली. तरुण पोरं वराती समोर बराच वेळ नाचल्याने वऱ्हाडाला लग्न मंडपात पोहचायला उशीर झाला. मात्र धक्का तेव्हा बसला, जेव्हा नवऱ्या मुलाला लग्नमंडपात यायला उशीर झाल्याने,नवरी मुलीकडील वऱ्हाडी मंडळींनी आपल्या नवरीचे दुसऱ्याच मुलासोबत लग्न लावून दिलं.

अलीकडच्या काळात मोठ्या प्रयत्नानंतर लग्न जमतं. मात्र नवऱ्या मुलाला लग्नमंडपात यायला उशीर झाल्याने, मुलीच्या वडिलांनी आणि नवरी मुलीकडच्या व मंडळींनी चक्क दुसऱ्याच मुलासोबत लग्न लावून दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेमुळे नवऱ्या मुलाला ओल्या हळदीसह स्वतःच्याच लग्नमंडपातून लग्न न करताच घरी परतावं लागलं आहे. ही घटना सिंदखेडराजा तालुक्यातील असून, कंडारी या गावच्या एका तरुणाचे नातेवाईक असणाऱ्या मलकापूर पांगरा याठिकाणी लग्न जमले होते.  लग्नाचा मुहूर्त हा  23 एप्रिलला दुपारी होता.  नवरी मुलगी सजून-धजून नवऱ्या मुलाची मंडपात वाट पाहत होती. लग्नाची जोरदार तयारी देखील झाली होती.

लग्नाचा मुहूर्त जसजसा जवळ येत होता, तसतसे पाहुणे मंडळी देखील मोठ्या संख्येने लग्नमंडपात उपस्थित राहत होती. मात्र दुसरीकडे नवरदेवाची मित्र कंपनी आणि वर्‍हाडी मंडळी डीजेच्या तालावर नाचण्याची व्यस्त होती. नवरदेवाचे मित्र कंपनी मद्यपिऊन नाचत असल्याची देखील माहीती आहे. लग्नाचा मुहूर्त दुपारी असताना या बहाद्दरांनी दुपारीच वरात काढली, त्यामुळे मंडपात यायला रात्रीचे आठ वाजले.

लग्न दुसऱ्या मुलासोबत का लावले?

लग्नाचा मुहूर्त दुपारीच होता. मात्र दुपारीच वरात काढल्यामुळे लग्नमंडपात नवऱ्या मुलाला यायला उशीर झाला. नवरदेवला यायला उशीर का होतोय? अशी विचारना नवरीकडील मंडळी करत असल्याने, यातून वाद झाला. आणि या वादाचे भांडणात रूपांतर झालं. हे भांडण एवढया विकोपाला गेले की, नवरी मुलीकडील मंडळींनी वराकडील मंडळींना चांगलेच बदडले. एवढेच नाही तर, आमच्या मुलीचं तुमच्या मुलासोबत आम्हाला लग्नच लावायचं नाही, असं म्हणत नवरदेवाला मंडपातूनच हाकलून दिलं.

नवरीने केले दुसर्‍या मुलासोबत लग्न

नवरा मुलगा उशिरा लग्नमंडपात पोहोचल्यामुळे मोठा राडा झाला. नवरदेवाला भर मंडपातून हाकलून दिल्याने नवरी कडील मंडळीं देखील मोठ्या चिंतेत पडले. हळद लावलेल्या पोरीला घरी कसं घेवून जायचं, म्हणून नवरी मुलीच्या वडिलांनी नात्यामध्ये नवरा मुलगा शोधायला सुरुवात केली. अखेर त्याची शोधाशोध संपली, आणि दुसरबीड’ येथील नात्यामधीलच एक मुलगा त्यांना मिळाला.  आणि त्याच रात्रीत दोघांचे लग्न लाऊन दिले. आपण अनेक वेळा ऐकलं असेल, लग्न जरी मोडलं तरी माणूस खचून जातो. मात्र इथे भर मंडपात ठरलेलं लग्न स्वतःच मोडून, एका दुसऱ्याच मुलाला शोधून आपल्या मुलीचं लग्न लावून देण्याचा पराक्रम पित्याने केल्याने, सोशल मीडियावर याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

मुलानेही केले लग्न

नवरामुलगा लग्नमंडपात उशीरा पोहोचल्यामुळे झालेल्या राड्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वराकडील काही ज्येष्ठ मंडळी वधूच्या पित्याकडे गेले. तिथे देखील थोडाफार वाद झाला मात्र, अनेकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं. वधूला घातलेले दागिने आणि मानपानाच्या साड्या वधूच्या मंडळींनी वराकडील मंडळींना परत केल्या. ओली हळद अंगावर लावून बसलेल्या नवऱ्या मुलाने देखील आपल्या आत्याच्या मुलीसोबत देऊळगाव कोळ याठिकाणी लग्न केले.  दोघांचेही लग्न वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याने या प्रकरणात काही अनुचित प्रकार घडला नाही.

हे देखील वाचा Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

Lifestyle: नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने जुन्या बॉयफ्रेंड सोबत..,वरून म्हणतेय असं करणं योग्य..

Flipkart Month-End Mobiles Fest: Flipkart ची करामत! २२ हजाराचा सॅमसंगचा हा फोन केवळ सहा हजारांत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.