Lifestyle: ‘या’ चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून..
Lifestyle: पती-पत्नीचं नातं हे माणसाच्या आयुष्यात किती महत्वाचा रोल अदा करतं, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. नवरा-बायको दोघेही सुखी असतील तर संसाराचा गाडा उत्तम रित्या हकला जातो. किंवा आपण असंही म्हणू, नवरा-बायको दोघांनी एकमेकांची उत्तमरित्या काळजी घेतली, तर संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो. नवरा-बायकोचं नातं सुखी ठेवायचे असेल, तर या नात्यात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागतं. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. पती-पत्नीच्या नात्यात छोट्या गोष्टीवरून वाद झाला तरी, या वादाचे रूपांतर भांडणात व्हायला वेळ लागत नाही.
पती-पत्नीचा संसार सुखाचा व्हायचा असेल, तर या चार सवयीकडे लक्ष द्यावे लागेल. ज्या आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही या चार सवयीची किंवा गोष्टींची काळजी घेतली नाही, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागेल. खास करून पतीने चुकूनही या चार गोष्टी करू नयेत, कारण या चार गोष्टीं तुमच्या पत्नीला अजिबात आवडत नाहीत. या कोणत्या-कोणत्या चार सवयी किंवा गोष्टी आहेत, हे आज आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
आयुष्यात कुठेही गेला तरी, तुम्हाला तडजोड करावी लागते. अशीच परिस्थिती नात्यात देखील आहे. मग ते नातं आई-वडिलांचं असो, किंवा पती-पत्नीचं. तडजोड ही तुम्हाला करावीच लागेल. लग्नानंतर तुम्हाला सुखी संसार करायचा असेल, तर दोन्हीं जोडप्यांना स्वतःमध्ये थोडासा बदल करणं आवश्यक आहे. खास करून जे मुलं आतापर्यंत बॅचलर राहिली आहेत, अशा मुलांना बरेचदा एकटं-एकटं राहायची सवय असते. लग्नानंतर या मुलांना बऱ्याच प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते.
स्वतः मध्येच रमू नका
असं म्हटलं जातं, इतरांवर प्रेम करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवर प्रेम करावे लागेल. मात्र तुम्ही स्वतः मध्येच जास्त रमणं तुमच्यासाठी धो का दा य क ठरू शकतं. स्वतःचा विचार करणं ही चांगली गोष्ट आहे, मात्र तुम्ही नेहमी याचाच विचार करत असाल, आणि समोरच्याच्या भावना लक्षात घेत नसाल, तर तुमची पत्नी म्हणून, तुमच्या पार्टनरला हे कधीही आवडणार नाही. अनेकदा असं होतं, तुम्ही घरी असताना देखील तुम्ही काहीतरी कामात असता, तुमचं इंटेन्शन तसं नसेल, मात्र पत्नीकडे या काळात दुर्लक्ष होतं.
अनेकदा तुम्ही दोघेच बाहेर किंवा घरी असाल, तर स्वतः पेक्षा जास्त तुमच्या पार्टनरचा विचार करणं अधिक आवश्यक आहे. तुमच्या पार्टनरला काय हवं काय नको, याविषयी तुम्ही विचारणं आवश्यक आहे. ती बोलत नाही, मात्र अशी भावना तुमच्या पार्टनरचीच इच्छा असते. जर तुम्ही हे करत असाल, तर ही सवय लवकर बदला, आणि तुमच्या पत्नीचे अधिक प्रेम मिळवा.
इतर महिलांची जवळीक
मोस्टली कुठल्याही नात्याच, कटुता येण्याचं कारण म्हणजे, इतर गोष्टी किंवा महिलांची जवळीक वाढणे, हे एक महत्त्वाचं कारण पाहायला मिळतं. वैवाहिक जीवनात तुमची पत्नी व्यतिरिक्त इतर कुठल्याही महिलेशी जवळीक निर्माण होत असेल, तर तुम्ही याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कामानिमित्त इतर महिलेशी तुमची जवळीक वाढत असेल, तर ही गोष्ट तुमच्या पत्नीला नक्कीच आवडणारी नसते.
तुमच्या पत्नी समोर कधीही तुम्ही इतर महिलेचे कौतुक करणे म्हणजे मूर्खपणा आहे. कामानिमित्त ऑफिसमध्ये किंवा इतरत्र पत्नी व्यतिरिक्त एखाद्या महिलेशी संपर्क होत असेल तर, याविषयी तुम्ही तुमच्या पत्नीला सविस्तर सांगणे आवश्यक आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, म्हणून तुम्ही खोटं बोलून वेळ मारून नेहत असाल तर हे योग्य नाही.
खोटे बोलणे
तसं पाहायला गेलं तर खोटं बोलणं हे योग्य नाहीच. मात्र माणसाला अनेक वेळा खोटं हे बोलावं लागतं. मात्र पती-पत्नीच्या नात्यामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट लपवू शकत नाही. पत्नी नेहमी तुमच्या भल्याचाच विचार करत असते. सहाजिकच त्यामुळे तुमच्या सुखदुःखात ती सहभागी होत असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात किंवा इतरत्र घडणाऱ्या कुठल्याही गोष्टींविषयी तुम्ही खरं बोलणं आवश्यक आहे. एकमेकाशी खोटं बोलून, काही गोष्टी लपवून कुठलंही नातं दीर्घकाळ टिकत नाही.
टाईम न देणं
कुठल्याही नात्यात एकमेकांना समजून घेण्यासाठी टाईम देणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही एकमेकांना टाईम देत नसाल, तर साहजिकच तुम्ही एकमेकांना 100% समजू शकणार नाही. तुमच्या कामामुळे तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नसेलही, मात्र तरीदेखील तुम्हाला तुमच्या पत्नीसाठी वेळ काढावा लागेल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी आणि एकमेकांच्या आयुष्यात प्रेम भरण्यासाठी तुम्हाला अनेक अविस्मरणीय क्षणांची गरज असते.
पत्नीला नेहमी तुमचा मौल्यवान वेळ तिच्यासाठी द्यावा, अशी प्राथमिकता असते. यासंदर्भात तुमची पत्नी काही बोलत नाही, याचा अर्थ तिला काही कळत नाही, असा मुळीच होत नाही. ती या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असते. तुमच्याबद्दल तिच्या मनातून हळूहळू आदर कमी होत जातो. त्यामुळे सुखी संस्कार करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या पत्नीला वेळ देणं फार आवश्यक आहे.
हे देखील वाचा Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..
ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम