Navneet Rana: ठाकरे सरकारचा दणका! राणा दाम्पत्याना होणार तीन वर्षांची शिक्षा..

0

Navneet Rana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना आव्हान देण्याचं प्रकरण राणा दाम्पत्याना चांगलंच भोवलं असल्याचं पाहायला मिळत आहे. 23 तारखेला मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. आता या प्रकरणाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून, राणा दाम्पत्यावर ‘राजद्रोहाचा’ गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीतून नवनीत राणा यांनी आपण 23 तारखेला मारतोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान शिवसैनिकांना दिलं. शिवसैनिकांनी देखील हे आव्हान स्वीकारत, मातोश्री काय तुम्ही मुंबईत येऊन दाखवा म्हणत, राणा दाम्पत्याना प्रत्युत्तर दिलं. शिवसैनिकांना नवनीत राणा आपल्या मुंबईच्या निवासस्थानी दाखल झाल्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर, शिवसैनिक खासदार नवनीत राणा यांच्या घरीजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

खार पोलिसांनी राणा दाम्पत्याना घरी जाऊन अटक केली. खार पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर 153a कलमांतर्गत या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान खार पोलीस आणि राणा दाम्पत्यं यांच्यात काल हाय वोल्टेज ड्रामा पहिला मिळाला. आज पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर, राणा दांम्पत्यावर १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला, असल्याची माहिती सरकारी वकील ‘प्रदीप घरत’ यांनी दिली. आरोपी रवी राणा आणि नवनीत राणा यांना वांद्रेच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली आहे.

दोघांच्याही जामिनावर तात्काळ सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. आता 29 एप्रिल रोजी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या जामिनावर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांची आता तळोजा कारागृहात रवानगी होणार असल्याचं कळतंय.

काय म्हणाले सरकारी वकील?

दोन्ही आरोपींवर १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने दाखल केलेल्या जामीन अर्जावर 27 तारखेला आम्ही सुनावणी करणार आहोत. आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने आम्हाला 27 तारखेला लेखी म्हणणे, मांडण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्याच्या घरी कोणाला जायचं असल्यास, परवानगी घ्यावी लागते. यासंदर्भातली नोटीस देखील नवनीत राणा आणि रवी राणा यांना दिली होती.

नोटिशीला न जुमानता शासनाला आव्हान देणं, मुख्यमंत्री यांना अपशब्द बोलणं, आणि आव्हान देणं, यामुळे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर कलम 123-अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशी देखील माहिती सरकारी पक्षाचे वकील, प्रदीप घरत यांनी दिली. राजगृह सारख्या गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणी चांगलेच वाढल्या आहेत.

१२४ अ कलमात दोषी आढळल्यास किती शिक्षा होऊ शकते?

१२४ अ हा राजद्रोहाचा गुन्हा असून, यासाठी आरोपींना तीन वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. या गुन्ह्यात जर रवी राणा आणि नवनीत राणा दोषी आढळले तर, त्यांना तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर 353 नुसार दुसरी एक एफआरआय दाखल केली असल्याची माहिती आहे. राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पठणाचे हे प्रकरण चांगलेच भोवलं असून, या प्रकरणात आता पुढे काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा Navneet Kaur Rana: पोलीस स्टेशनच्या बाहेरच शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या हनुवटीतून काढलं र क्त; व्हिडिओ व्हायरल..

Chandramukhi: बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संबंधांची आज नव्याने चर्चा का होतेय? तुम्हाला माहिती आहे का हे प्रकरण..

Viral video: चरत असणाऱ्या उंटाला विनाकारण मारलं काठीने; संतापलेल्या उंटाने ताणून मालकाचा केला भुगा..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.