शिक्षकाच्या मुलानेच हुंड्यासाठी भर मंडपात लग्नास दिला नकार; व्हिडिओ पाहून तुमचाही संताप होईल अनावर

0

आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, महिला सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. मात्र समाजात अजून देखील पुरुष प्रधान संस्कृती आणि महिलांचा छळ काही पूर्णपणे नाहीसा झाला नाही. हे वेळोवेळी दिसून येत आहे. हुंडया बद्दल कोणालाही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. हुंडा हा प्रत्येकाच्याच ऐकण्यातला शब्द आहे. 21वा शतकानंतर देखील मुली होंडा देतात, यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र समाजातून हुंडा घेण्याची पद्धत काही पूर्णपणे संपुष्टात आली आहे, असे नाही.

आज देखील काही समाजात हुंड्यासाठी महिलांचा छळ होताना पाहायला मिळतो. मात्र बिहार मधल्या एका प्रकारचा तुम्हाला प्रचंड तिरस्कार आल्या शिवाय राहणार नाही. हुंड्यासाठी महिलांचा छळ काही नवीन नाही. हुड्यासाठी महिलांचा छळ करणाऱ्या अनेक धक्कादायक बातम्या तुम्ही अनेकवेळा वाचल्या असतील. पण बिहारमध्ये घडलेली ही घटना वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहणार नाही.

बिहार मधील एका खेडेगावात भर मंडपात नवरदेव हुंड्याची मागणी करू लागला. कमी हुंडा मिळाला आहे म्हणून, गडी भर मंडपात लग्न करण्यास नकार देऊ लागला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत नवरदेव आपल्याला ठरल्यापेक्षा कमी हुंडा दिला असल्याचं म्हणत आहे. हा व्हिडिओ क्षणात तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस या नवरदेवाला लग्नाला का तयार होत नाहीस असं विचारलं असता, तो म्हणतोय मला हुंडा ठरला होता त्याप्रमाणे दिला नाही. एक लाख रुपये मला देणार होते, याबरोबरच आणखी बऱ्याच वस्तू देणार म्हंटले होते. विशेष म्हणजे, हा गडी सरकारी नोकर आहे. आणि त्यावरून आश्र्चर्य म्हणजे, त्याचे वडील शिक्षक आहेत.

शिक्षकाचे काम हे समज घडवण्याचं असते, हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. मात्र आपलाच मुलगा भर मंडपात हुंड्यासाठी संतापला आणि लग्नास नकार देऊ लागला. एका शिक्षकाच्या मुलाच्या या कृत्याचा निषेध शब्दात करताच येऊ शकत नसल्याच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हे देखील वाचा लहर आली की शेतकरीही कहर करू शकतो; पट्ट्याने तीन महिने अफूच्या शेतीचा ठावठिकाणा लागू दिला नाही! ‘फिल्मी कहाणी’ वाचा सविस्तर

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण...

पंजाब,गोवा, उत्तराखंडसह यूपीतही काँग्रेसचीच सत्ता? वाचा काय म्हणतायेत एक्झिट पोल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.