सोमय्याचा दलाल,भडवा असा उल्लेख; आजच्या पत्रकार परिषदेतले ‘हे’ आहेत तिन महत्वाचे मुद्दे

0

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित संजय राऊत यांच्या शिवसेना भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला मदत करा अन्यथा, तुम्हाला नंतर याचा पश्र्चाताप होईल. एवढंच नाही तर केंद्रीय यंत्रणांकडू तुम्हाला फिक्स करण्यात येईल, असं मला यापूर्वीच सांगण्यात आलं होतं. असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेना आणि ठाकरे कुटुंबावर ज्या पद्धतीने हल्ला होतोय. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे, मात्र आता झुकेंगे नहीं, म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनमध्ये प्रत्रकार परिषद घेतली. संजय राऊत या पत्रकार परिषदेत भाजपच्या अनेक बड्या नेत्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

शिवसेनेचे आमदार खासदार आणि अनेक महत्त्वाचे नेते त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करत भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांवर शरसंधान साधले. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात एकच खळबळ उडाली असून, आता या पत्रकार परिषदेचे पडसाद देशभर पडण्याच्या चर्चाही रंगली आहेत.

पीएमसी बँक घोटाळ्याशी आमचे संबंध आहेत, असं भडवा किरीट सोमय्या म्हणतो, मात्र राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. निकॉन इन्फ्रा कंपनी ही किरीट समोय्यांच्या मुलाची आहे. या कंपनीमध्ये किरीट सोमय्या आणि राकेश वाधवानचे हे पार्टनर आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून राकेश वाधवानकडून ८०ते १०० कोटींची कॅश घेतली. असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांच्यावर केला.

भाजपाबरोबरच संजय राऊत यांनी ईडीवर देखील जोरदार हल्ला चढवला, आणि खळबळजनक आरोप केला. मुंबईतल्या साठ बिल्डर्सकडून, जितेंद्र नवरा आणि बरोबर आणखी चार जण खंडणी गोळा करण्याचं काम करतात. हे सगळे ईडीचे दलाल आहेत. यांनी आत्तापर्यंत ३०० कोटी वसूल केले आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. या या सगळ्या प्रकरणासंदर्भात मी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. जेलमध्ये जाणारी भाजपाची साडेतीन लोकं कोण आहेत? ते उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला कळेल, असं देखील संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.