मोदींसोबत नेहमी स्टेजवर असणाऱ्या अग्रवाल’ने मल्ल्या, निरव मोदी पेक्षाही मोठा भष्टाचार केला; ‘हे’ आहे नरेंद्र मोदी कनेक्शन

0

विजय मल्ल्या निरव मोदी, मेहुल चोक्सी या तिघांपेक्षाही मोठा, इतिहासातला सर्वात मोठा कर्ज घोटाळा करणाऱ्या ऋषी कमलेश अग्रवालवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने अग्रवालवर गुन्हा दाखल केला असला तरी, हा भामट्या गेले अनेक महिने विदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे देशात पुन्हा विजय मल्ल्या, निरव मोदीच्याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळतंय.

स्टेट बँके बरोबरच इतर २८ बॅंकांच्या तब्बल २३ हजार कोटी रुपयांवर या बहाद्दराने डल्ला मारला आहे. बँकेच्या फसवणुकी प्रकरणात इतिहासातला आजवरचा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचं बोललं जातंय. यापूर्वी विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहोल चोक्सी या तिघांनी मिळून २२ हजार ५८५ कोटी रुपयचा गंडा बॅंकांना घातला होता. मात्र एबीजी शिपयार्ड कंपनीचे तत्कालीन चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी अगरवालने स्टेट बँकेसह एकूण २८ बँकांना तब्बल २२ हजार ८४२ कोटींना गंडवले आहे.

विजय मल्ल्या निरव मोदी प्रमाणेच देशातल्या आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार करून अगरवाल देखील गेल्या काही महिन्यांपासून विदेशात आहे. एबीजी शिपयार्ड ही एक जहाजबांधणी कंपनी असून, या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. मात्र जहाज निर्मितीचे केंद्र हे गुजरातमध्ये सुरत याठिकाणी आहे. अनेक बँकांकडून या कंपनीसाठी कर्ज घेण्यात आले, मात्र हे कर्ज इतरत्र ठिकाणी वापरण्यात आलं आणि म्हणून या कर्जाची परतफेड झाली नसल्याचं समोर आलं आहे.

बॅंकांना २४ हजार कोटींचा गंडवणारा ऋषी कमलेश अगरवालवर हा नरेंद्र मोदींसोबत अनेक वेळा स्टेजवर असायचा. कंपनीसाठी कर्ज उपलब्ध करण्यासाठी याने अनेक अधिकार्‍यांचा सहारा घेतला. नेते मंडळींचा सहारा घेतला, आणि हे सगळं नरेंद्रमोदी यांचा हात असल्यामुळेच शक्य झालं, असं सोशल मीडियावर बोलताना पाहायला मिळत आहे.

एवढंच नाही तर, ABG शिपयार्ड कंपनीनला २००७ मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना, गुजरात सरकारने, १२१००० चौरस मीटर जागा दिली. गुजरात सरकारने ऋषी अगरवालला १४०० प्रति चौरस मीटरची जमीन ७०० प्रति चौरस मीटरने दिली असल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं होतं. या प्रकरणावर काँग्रेसने देखील आपली भूमिका मांडली असून, याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असल्याचे म्हटलं आहे.

विजय मल्ल्या, निरव मोदी प्रमाणे बँकांचे पैसे पडून अगरवाल देखील विदेशात वास्तव्यास आहे, या घटनेमुळे आता शेअर मार्केटवर देखील खूप मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा घोटाळा २०१३ मध्ये च झाला असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सांगण्यात येत असला तरी, स्टेट बँक ऑफ इंडियाने ८ नोव्हेंबर २०१९ला तक्रार दाखल केली. सीबीआयने या प्रकरणाची  बॅंकेकडे २१ मार्च २०२० ला आणखी सविस्तर माहिती मागवली, ऑगस्ट २०२० ला बँकेने पुन्हा नव्याने तक्रार दाखल केली. १४ महिन्याचा तपासानंतर आता सीबीआयने सात फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.