“तु राजीव गांधींचा पुत्र असल्याचा पुरावा कधी मागितला आहे का” मुख्यमंत्र्यांची जीभ पुन्हा घसरली, व्हिडिओ व्हायरल

0

देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाने जोरदार ताकत लावल्याचं चित्र आहे. प्रत्येक पक्षांचे प्रचाराचे वारे जोरदार वाहत असल्याचे पाहायला मिळत असून, विरोधक एकमेकांवर जोरदार हल्ला करत आहेत. विरोधकांची एकमेकांवर टीका करणं, ही नवीन गोष्ट नाही. मात्र काहीवेळा टीका करत असताना अनेकांच्या तोंडून अपशब्द निघाल्याचं पाहायला मिळतं. उत्तराखंडच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान देखील राहून गांधी विषयी बोलताना भाजपाने पातळी सोडल्याचे पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब गोवा, मणिपुर,आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू असून, प्रत्येक पक्षाने आपापली कंबर कसली आहे. महागाई, बेरोजगारी, विकास, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याचं, अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारतीय जनता पार्टी विरोधकांवर टीका करताना, मात्र या मुद्द्यावर जास्त बोलताना दिसत नसून, अजूनही काँग्रेसने 70 वर्षे राज्य केलं. हाच मुद्दा प्रामुख्याने भाजपा पुढे आणताना पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पार्टीकडून विरोधकांवर टीका करताना देशाचा सुरक्षेविषयी जास्त बोलल्याचं पाहिला मिळतं. भारतीय जनता पार्टी कडून अजूनही, काश्मीरमधून आम्ही कलम ३७० हटवलं. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. याच भावनीक मुद्यांवर बोललं जात आहे. यामुळे त्यांना सोशल मीडियावरून अनेकांकडून टिकेचा सामनाही करावा लागतोय. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पारतंत्र्यात राहिला. याला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार असल्याचं म्हटलं.

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना, आसामचे मुख्यमंत्री ‘एचडी सरमा’ यांचीही जीभ आता घसरली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आसामचे मुख्यमंत्री ‘एचडी सरमा’ म्हणाले, आम्ही राहुल गांधीला कधी तु राजीव गांधीचा मुलगा आहे. याचा पुरावा मागितला आहे का? अशी निंदनीय आणि खालच्या पातळीची टीका करण्यात आली. त्यांनी केलेल्या टीकेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

पुलवामा हल्ल्यात भारताचे अनेक जवान शहीद झाल्यानंतर, भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. मात्र भारताने केलेल्या या कारवाईचे पुरावे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यावेळी मागितले होते. आणि म्हणून त्यांनी राहुल गांधी यांना देखील तुम्ही राजीव गांधीचे पुत्र आहे, याचा आम्ही कधी पुरावा मागितला का? असं निंदनीय विधान केलं आहे. भारतीय जवानांवर पुलवामा अटॅक झाल्यानंतर अनेकांनी या विषयी शंका व्यक्त केली होती.

पाकिस्तान मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स भारतात आलच कसं? गुप्तहेर संघटना नक्की काय करत होती? हवाई मार्गाने जवानांनी का प्रवास केला नाही. असे असंख्य प्रश्न अनेकांकडून उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले होते. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहत असल्याने, राहुल गांधी यांनी देखील याबाबत अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित केले होते. आणि म्हणून याच प्रश्नाला धरून आसामचे मुख्यमंत्री यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणूकीचा प्रचार करताना, राहुल गांधी यांच्याविषयी हे निंदनीय आणि खालचा पातळीचं विधान केलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.