भारतात जन्मलो असतो तर क्रिकेटरच झालो नसतो; आपण एवढं प्रेम देऊनही ‘एबी’ असं का म्हणाला

0

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सला कोण ओळखत नाही असा, असा क्रिकेट चाहता जगभरात पाहायला मिळणार नाही. ३६० डिग्री प्लेयर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हा खेळाडू भारतातही कमालीचा लोकप्रिय आहे. भारतातही एबी डिव्हिलियर्सचे असंख्य क्रिकेट चाहते पाहायला मिळतात. आपले क्रिकेट करिअर ऐन भरात आलं असतानाच, अचानक त्याने घेतलेली निवृत्ती क्रिकेट चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली होती.

भारताविरुद्ध खेळताना देखील भारतीय प्रेक्षक एबी डिव्हिलियर्स नावाचा जयघोष करताना आपण अनेक सामन्यात पाहिलं असेल. भारताविरुद्ध उत्तम फलंदाजी करताना, भारत सामना हारत असताना देखील, त्याला भारतीय प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाचे वर्णन करताच येऊ शकतं नाही. असं एबी डिव्हिलीयर्स अनेक वेळा म्हणालाय. मात्र रॉयल चॅलेंजर संघाच्या पॉडकास्ट कार्यक्रमात धक्कादायक त्याने एक विधान केले आहे.

जगाच्या लोकसंख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये क्रिकेट हा खेळ कमालीचा लोकप्रिय असून, भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान मिळवण्यासाठी असंख्य खेळाडू आपलं स्वप्न अजमावताना पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येत भारतीय संघात स्थान मिळवणं म्हणजे, हे ऐतिहासिक काम आहे. एबी डिव्हिलियर्सने देखील या विषयी भाष्य करताना, एक धक्कादायक खुलासा केला आहे.

एबी म्हणाला, जर मी भारतात जन्मलो असतो तर,मी भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकलो नसतो. भारतीय खेळाडूंकडे कमालीचे टॅलेंट असून, भारतात असंख्य सर्वोत्तम क्रिकेटर आहेत. अनेक खेळाडू मधून तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवायचे असेल, तर तुम्हाला काहीतरी विशेष असावं लागेल. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात मी असतो का नाही? हे मला माहीत नाही. आणि म्हणून भारतीय क्रिकेट खेळाडूंचे या गोष्टीमुळे विशेष कौतुक करायला हवं.

भारतीय लोकांकडून मला विशेष प्रेम मिळालं आहे. खास करून क्रिकेट चाहत्यांकडून. गेली पंधरा वर्षे मी आयपीएल खेळत आहे. त्यामुळे भारतीय लोकांची पद्धत,मला माहीत आहे. भारतात जन्म घेणं, आणि मोठं होणं, ही प्रक्रिया खूप मजेशीर आहे. या देशात कॉम्पिटिशन भरपूर असल्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं टॅलेंट आत्मसात करावं लागतं. आणि म्हणून कदाचित मी भारतीय संघात क्रिकेटर म्हणून आलोही नसतो. असं एबी डिव्हिलियर्स पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला. त्याच्या या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर त्याच्या या मोठीपण्याचे कौतुक केले जात आहे.

एबी डिव्हिलियर्सची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द ही खूप कमालीची राहिली आहे. एबी डिव्हिलियर्सने १८४ सामन्याचे प्रतिनिधित्व करताना जवळपास चाळीसच्या सरासरीने तब्बल ५१६२ धावा कुटल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या यादीत एबी डिव्हिलियर्सचा डेव्हिड वॉर्नर नंतर दुसरा क्रमांक लागतो. विराट कोहलीचा एबी डिव्हिलियर्स बेस्ट फ्रेंड म्हणूनही ओळखला जातो. विदेशी खेळाडूंच्या सर्वाधिक प्रेम करणाऱ्या यादीत, ‘एबी’चा पहिला क्रमांक लागतो.

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.