एका मुस्लिम मुलीला का घेरतायत ‘शंभर’ जण; कुठून सुरु झाला ‘हा’ वाद, काय आहेत कारणे…

0

डिसेंबरमध्ये सहा मुस्लिम मुलींना कर्नाटक राज्यामधील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर या ठिकाणच्या एका खाजगी महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटक राज्याने सरकारी महाविद्यालयाला ड्रेस कोड परिधान केल्याचं सांगण्यात येतंय. हिजाब घालून सहा मुस्लिम मुलींनी महाविद्यालयात प्रवेश केला. परंतु महाविद्यालय प्रशासनाने त्या मुलींना प्रवेश नाकारला. आणि तेव्हापासून हा वाद सुरू झाला असून, हा वाद आता इतर महाविद्यालयात देखील येऊन पोहचला असल्याचं पाहायला मिळत आहे.

सहा मुलींनी ड्रेस कोड न घालता हीजाब परिधान करून कॉलेजमध्ये प्रवेश केला. मात्र कॉलेज प्रशासनाने हा प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारल्याने सहा मुलीं ‘उडुपी’ जिल्हाधिकारी यांच्याकडेही गेल्या. मात्र तिथे त्यांच्या समस्यांचे निरसन झाले नाही. म्हणून त्या मुलीं न्यायालयात गेल्या. आता या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र हा वाद आता कर्नाटकच्या इतर महाविद्यालयात येऊन पोहोचला, असल्याचे पाहायला मिळत आहे.

सहा मुलींनी हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश केला, त्यांना प्रत्यूत्तर म्हणून, आता सहा मुलांनीही चिखमंगलूर या ठिकाणी भगवे शेले घातले. जर त्या मुलींना हिजाब घालण्यास परवानगी देणार असाल तर आम्हाला देखील भगवे शेले घालायला परवानगी द्या, असं या मुलांचं म्हणणं होतं. आणि तिथून खऱ्या अर्थानं भगवे शेले आणि हिजाब हा वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून याचे पडसाद आता इतर महाविद्यालयातही उमटत आहेत.

हिजाब आणि भगवे शेले हा वाद आता कर्नाटकचा इतर जिल्ह्यात, महाविद्यालय देखील पाहायला मिळत असून, विद्यार्थी मोठ्याप्रमाणात भगवे शेले घालून हिजाब या प्रकरणाचा जोरदार विरोध करताना पहायला मिळत आहेत. कर्नाटकच्या ‘मांडया’मध्ये या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मुस्कान नावाची एक मुस्लिम तरुणी एका कॉलेजमध्ये आपल्या असायमेंट जमा करण्यासाठी दुचाकीवरून उतरून जात असताना, खांद्यावर भगवे शेले असणार्‍या, काही मुलांनी तिच्यासमोर जय श्रीराम नावाच्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुस्कान नावाची हिजाब घातलेली मुलगी कॉलेजकडे जात असताना, काही मुलांनी तिला घेरण्याचा प्रयत्न केला, आणि जय श्रीराम नावाच्या घोषणा दिल्या. भगवे शेले घातलेली तीस-चाळीस मुलं या मुस्कान समोरून भगवे झेंडे फिरवताना या व्हीडिओत पाहायला मिळत आहे. मात्र त्या तीस-चाळीस मुलांना न घाबरता तिने देखील ‘अल्लाहू अकबर’ नावाच्या घोषणा दिल्या. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकांनी या मुलीचं कौतुक देखील केल्याचं पाहायला मिळत आहे.

या प्रकरणावर बोलताना मुस्कान नावाची ही मुलगी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीचे संवाद साधताना म्हणाली आहे, मी एका असाइन्मेंट साठी कॉलेजमध्ये जात होते. मात्र या लोकांनी मला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. बुर्का हटवल्यानंतरच तुला आत जाता येईल, मात्र त्यांच्या कृत्याला मी न घाबरतात आत गेले, आणि मग त्यांनी जय श्रीराम नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, मला घेरण्याचाही प्रयत्न केला. शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी मला मदत केल्याचही तिने या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.