लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शाहरुख खान थुंकला? व्हायरल फोटोमागचं हे आहे ‘सत्य’ जाणून तुम्हीही घालाल शिव्या
काल रविवारी सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात भारताची गानकोकिळा म्हणून ओळखला जाणाऱ्या, लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि संपूर्ण देशावर शोककळा पसरली. एकीकडे संपूर्ण देश दुःखात असताना दुसरीकडे मात्र शाहरुख खानने लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकल्याच्या चर्चा होत असून, शाहरुख खानला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येत आहे. आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत.
काही महिन्यांपूर्वी आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे शाहरुख खान कमालीचा चर्चेत आला होता. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर शाहरुख खानवर खूप मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. अनेकांकडून त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाणावर आला असून, तो लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला असल्याचं म्हटलं, सोशल मीडियावर म्हटलं जाऊ लागलं आहे.
लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना, शाहरुख खान आपला मास्क खाली ओढत थुंकल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा फोटो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला, आणि शाहरुख खानला ट्रोल करण्यात आलं. मात्र नंतर इस्लाम धर्म जाणकारांनी शाहरुख खान थुंकला असल्याचा दावा खोडून काढला आहे. अंत्यसंस्कारावेळी शेवटचा निरोप घेताना, पार्थिवावर फुंकर मारली जाते.असं इस्लामिक धर्माचा अभ्यास असणाऱ्यांनी म्हटलं आहे.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारकरण्यात आले. यावेळी राजकीय क्षेत्राबरोबरच कला, क्रीडा, आणि सांस्कृतिक क्षेत्रातीलही अनेक मान्यवर लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान अशी अनेक दिग्गज मंडळी लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आली होती.
शाहरुख खान देखील लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर पोचला होता. शाहरुख खानला लता मंगेशकर यांचा अधिक जिव्हाळा राहिल्याचं त्याने अनेक कार्यक्रमांमधून सांगितल्याचं ऐकायला मिळालं आहे. शाहरुख खान यांनी लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना लता मंगेशकर यांच्यासाठी दुवॉ मागितली. त्याबरोबरच तोंडावरचा सास्क खाली काढून, त्यांच्या पार्थिवावर फुंकर मारली. इस्लाम धर्मात मयत व्यक्ती स्वर्गात जाण्यासाठी फुंकर मारली जाते. आपली दुवॉ अल्लाच्या दरबारी जावी, म्हणजेच ईश्वरापर्यंत पोहचावी, यासाठी फुंकर मारली जाते.
मुस्लिम धर्मात शेवटचा निरोप घेण्यासाठी आणि त्याला स्वर्ग प्राप्त होण्यासाठी त्यांच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते. आणि म्हणून शाहरुख खानने आपला मास्क खाली उतरवत लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर फुंकर मारली, असल्याचं समोर आलं आहे. यामुळे लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शाहरुख खान थुंकला असल्याचा दावा खोटा असल्याचं सिद्ध झाले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम