अमोल कोल्हेंनी ‘असं काय’ केलं, ज्यामुळे ‘शरद पवारच’ तोंडावर पडले; पुन्हा नवा वाद…

0

‘Why I killed Gandhi’ या चित्रपटात ‘अमोल कोल्हे’ यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारण्याचे समोर आल्यानंतर, राज्यात प्रचंड राजकारण तापल्याचे पहायला मिळाले होते. काहींनी ‘अमोल कोल्हे’ यांनी ही भूमिका कलाकार म्हणून साकारली असल्याचे सांगत समर्थन केले. तर काहीही जरी त्यांनी कलाकार म्हणून भूमिका साकारली असली तरी, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. असंही स्पष्ट केले. यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही समावेश होता.

एकीकडे राष्ट्रवादीचे अनेक नेते अमोल कोल्हेच्या भूमिकेचे समर्थन होऊ शकत नसल्याचे सांगत असतानाच, दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांनी अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून ही भूमिका साकारली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना टार्गेट केले जाऊ शकत नाही,असं म्हटल. पवारांच्या या भूमिकेमुळे विरोध करणारे राष्ट्रवादीचे अनेक नेते तोंडावर आपटले. मात्र आता पुन्हा या प्रकरणाने वेगळच वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथूराम गोडसे यांची भूमिका साकारल्यामुळे चहूबाजूंनी अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उडाल्यानंतर अखेर 30 तारखेला अमोल कोल्हे, यांनी इंद्रायणीच्या काठी आळंदीत आत्मक्लेश केले. जरी आत्मक्लेश केले असेल तरी, अजूनही त्यांच्या अडचणी कमी होताना पाहायला मिळत नाहीत.

नथुराम गोडसेचे ‘उदात्ती’करणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याच्या मुहूर्तावर हा नवा वाद निर्माण झाला. अमोल कोल्हेंनी या चित्रपटात नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे हा चित्रपट अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. या वादावर स्पष्टीकरण देताना अमोल कोल्हे यांनी मी हा चित्रपट राष्ट्रवादीत येण्यापूर्वीच 2017 ला केला होता. नथुराम गोडसेची भूमिका मी एक कलाकार म्हणून स्वीकारली होती. या विचारधारेचं मी कधीही समर्थन केले नाही, आणि कदाही करणारही नाही.

एकीकडे अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी, दुसरीकडे सोशल मीडियावरून या भूमिकेचे कदापीही समर्थन होऊ शकत नाही, असा सूर उमटल्याचे दिसून आले. त्या सोबतच सत्तेतला मित्र पक्ष काँग्रेसने देखील आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली. सगळीकडून विरोध होत आहे, ही बाब लक्षात घेऊन कोल्हे यांनी ‘आत्मक्लेश’ करण्याचा निर्णय घेतला.

लोकांनी मला महाराजांच्या भूमिकेत पाहिलं आहे, आणि त्यामुळे आता मला नथूराम गोडसे यांच्या भूमिकेत स्वीकारलं जाऊ शकत नसल्याचे, अनेकांनी म्हटल्याने मी स्वतः आता आत्मक्लेश करत असल्याचे सांगत नथूराम गोडसे यांनी इंद्रायणीच्या काठी आळंदीत जाऊन आत्मक्लेश केले. आणि म्हणूनच कोल्हेनी आत्मक्लेश केल्याने शरद पवार तोंडावर पडल्याचं सोशल मीडियावर म्हटले जाऊ लागलं आहे. जर त्यांनी कलाकार म्हणून गोडसेची भूमिका साकारली होती, तर आता आत्मक्लेश करायची काय गरज होती, असा सूर आता सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.