मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का? लाखो-करोडो बेरोजगारांनी भजी तळली तर खायला येणार कोण

0

एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असतानाच,  भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून बिहार उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतल्याचेही पाहायला मिळाले. परिक्षेत घोळ झाल्याचे सांगत विद्यार्थी आता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारवर मोठा रोष असल्याचे दिसून येत आहे.

देशात आंदोलन हा विषय आता नवीन राहिला नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं होतं, केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातल्या शेतकरी जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असल्याचे पाहिले. या आंदोलनात जवळपास सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नसून केंद्र सरकारने या शेतकऱ्यांची केलेली हत्या असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

विरोधकांकडून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर धरले. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे माघारी घेतले असले तरी, हा निर्णय पंतप्रधानांनी आगामी उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याणा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता पुन्हा रेल्वे परीक्षेत घोळ झाल्याचे कारण सांगत विद्यार्थी आंदोलन करताना दिसून येत आहेत. 26 जानेवारीला आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. काही विद्यार्थ्यांनी ट्रेनला आग लागल्याचा आरोप करण्यात आला.

बेरोजगारीचा दर वाढत चालल्याने केंद्र सरकारच्या काही नेत्यांकडून गेल्या काही महिन्यांपूर्वी नोकरी न करण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे बना. असे देखील सांगण्यात आलं होतं.  आणि भजी विकण्याचा पर्याय या नेत्यांकडून बेरोजगारणांसमोर ठेवल्यास पाहायला मिळालं होतं. रेल्वे परीक्षेत घोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भजी तळण्याचा प्रश्न आत पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

आंदोलन करणारे विद्यार्थी संतप्त झाले असून, या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावायला सुरूवात केली आहे. जर आम्हाला भजीच तळायची होती तर, आम्ही पदवी कशासाठी घेतली? लाखो करोडो विद्यार्थ्यांना जर तुम्ही भजी तळायला लावणार असाल तर खायला येणार कोण? असा संतप्त सवाल आता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.