मनसेच्या मागणीला मिळाले यश, मोबाईल रिचार्ज बाबत TRAI ने दिला मोठा निर्णय, आता रिचार्ज..
टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ने मोबाईल ग्राहकांना गोड बातमी दिली आहे. नुकताच त्यांनी एक टेलिकॉम टॅरिफ आदेश जारी करून यामध्ये सिमकार्ड कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सिमकार्ड कंपन्यांना ट्रायच्या नव्या आदेशानुसार २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान आदेश जारी झाल्यापासून ६० दिवसांपर्यंत सादर करावे लागणार आहेत.
ट्रायच्या नवीन निर्देशानुसार, प्रत्येक सिमकार्ड कंपनीने किमान एक प्लान वाउचर, एक स्पेशल टॅरिफ वाउचर आणि एक कॉम्बो वाउचर असे सादर केला पाहिजे अशी सक्ती त्यांच्यावर करण्यात आली आहे. त्या व्हाउचरची वैधता २८ दिवस नसून पूर्ण ३० दिवस असणार आहे. सिमकार्ड कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना अगोदर घेतलेला प्लॅन पुन्हा रिचार्ज करायचे असल्यास, त्या ठराविक तारखेपासूनच पुन्हा रिचार्ज करता येईल, अशी तरतूद केलेली हवी.
टेलिकॉम कंपन्यांना महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने रिचार्ज प्लॅन २८ दिवसांचा नको तर ३० दिवसांचा करण्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कंपन्या एका महिन्याचे पैसे घेऊन २८ दिवस सेवा देतात असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने केला होता. अध्यक्ष सतिश रत्नाकर नारकर यांनी इशारा दिला होता.
वास्तविक पाहता व्होडाफोन आयडिया (VI), जिओ (JIO), एअरटेल (Airtel) या कंपन्या ग्राहकांना ३० दिवसांऐवजी २८ दिवसच सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे २ दिवस प्रमाणे विचार केला तर कंपन्या २४ दिवस वाचवत आहेत. महिन्याच्या रिचार्ज मध्ये २८ दिवस, दोन महिन्यांच्या प्लॅन मध्ये ६० ऐवजी ५६ दिवस तर तीन महिन्यांच्या प्लॅन मध्ये ८४ दिवसांची सेवा मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: नवाब मलिक तुला आम्ही लवकरच बांगड्या, घागरा-चोळी घालून डान्स बारमध्ये आयटम साँगवर नाचायला लावणार
भारतात जाऊ नका,बलात्कार आणि दहशतवाद वाढलाय; जो बायडेन यांच्या वक्तव्याने खळबळ
फौजीने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा घेतला बदला, कोर्टातच दिलशाद हुसेनला संपवला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम