टाक्या,तांबेरा,करपा,मावा,मर या रोगांमुळे यावर्षी कांद्याने शेतकऱ्यांना रडवले; या रोगांवर उपाय सापडलाय,वाचा सविस्तर

0

दर वर्षीपेक्षा यावर्षी अधिक अवकाळी पाऊस, अचानक होणारी गारपीट आणि सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. अधिक मशागती बरोबरच खतांचा आणि औषधांचा अधिक वापर या काळात करावा लागतो. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

रब्बी हंगामातील पिकांची शेतकरी अधिक काळजी घेत असला तरी यावर्षी सतत असणारे ढगाळ वातावरण, अचानक वातावरणात होणारे विविध बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, अशा अनेक समस्यांचा सामना शेतकर्‍याला यावर्षी करावा लागल्याने, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. आणि म्हणून शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

शेतकऱ्यांसाठी सध्याचे वातावरण अनुकूल नसल्याने आम्ही रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायची? आणि आपले पीक अधिक रोगापासून कसे वाचवायचे? याविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. शिवाय सध्या कांदा या पिकाला कोणकोणते रोग जडलेल्या आहेत? याचीदेखील माहिती देणार आहोत, शिवाय त्यापासून कांद्याचे संरक्षण कसं कराल? याची देखील माहिती देणार आहोत.

सध्या वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे कांदा या पिकाला मोठ्या प्रमाणात रोगाची लागण झालेली आपल्याला पाहायला मिळते. कांद्याला करप्याबरोबरच, टाक्या या नावाच्या किडीचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतोय. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ‘तांबेरा’ आणि ‘मावा’ हा रोग देखील आढळून आल्याचे पाहायला मिळाले आहे. वरील सर्व रोगांमध्ये आता आणखी एका ‘मर’ नावाच्या रोगाची भर पडल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.

ढगाळ वातावरण, सतत वातावरणात बदल, अचानक अवकाळी पाऊस, यामुळे आपण चर्चा केलेल्या वरील रोगांचा अधिक प्रभाव पिकांवर पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर या रोगापासून पिकांना कसं वाचवायचं? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोग झाल्यानंतर पिकांवर औषध फवारणी करण्यापेक्षा लागवड करण्याअगोदरच त्याची योग्य मशागत आणि काळजी घेणे गरजेचे आहे.

जर तुम्ही कांदा लागवड करणार असाल तर, साधारण 40 दिवसांनंतरच कांद्याची लागवड करणे गरजेचे आहे. लागवड करताना आपल्याला आणखी एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे लागवड करण्याच्या अगोदर 15 ते 20 दिवस शेतामध्ये 30 ते 35 टन सडलेले शेणखत घालायचे आहे. त्याचबरोबर रोप लावण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्याला 15 किलो नायट्रोजन, ६५-७५ किलो फॉस्फरस तसेच, ९०-१०० किलो पोटॅश लागवड क्षेत्रावर घातल्यानंतर आपल्या पिकांवर रोग अधीक हल्ला करणार नाही. त्यामुळे अशा भयानक वातावरणात लागवड करताना वरील माहितीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.