उद्धव ठाकरेंना आदित्यची चिंता,अजित पवारांना पार्थची चिंता; ही माजलेली लोकं

0

गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून एसटी बंद असल्याने राज्यातील सर्वसामान्यांचे अतोनात हाल होतानाचे चित्र दिसून येत आहे. राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलगीकरण व्हावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. राज्य शासन देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे सकारात्मकता दाखवत नसल्यचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मिटता मिटत नसतानाच आता या प्रकरणात माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी देखील उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल बोंडे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका आंदोलनाला संबोधतानाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे

गेल्या ८०दिवसांपासून राज्यातला एसटी कर्मचारी संपावर आहे. एसटी बंद आहे. मात्र या गोष्टींची अजिबात काळजी सरकारला नाही. यांना फक्त आपल्या मुलांची काळजी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आदित्यची चिंता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारांची चिंता मात्र संकटात असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांची चिंता कोणालाच नाही.

एवढाच नाही तर अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना देखील सोडलं नाही. शरद पवारांवर टीका करताना अनिल बोंडे म्हणाले, एसटी कर्मचऱ्यांच्या मुलांची चिंता स्वतः ला जनता राजा म्हणून घेणाऱ्या शरद पवारांना देखील नाही. अनिल परब बोलताना त्याच्या बोलण्यात किती गर्व आहे,हे तुम्हाला माहीत आहेच. ही सगळी माजलेली लोक आहेत. अशा घणाघात देखील माझी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केला आहे.

एसटी कर्मचऱ्यांचं सुरू असलेल्या एका आंदोलनाला संबोधताना अनिल बोंडे बोलत होते. या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना संबोधताना अनिल बोंडे यांनी महविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढविला. अनिल पराबंवर टीका करताना अनिल बाँडनी एकेरी भाषेचा वापर देखील केला. राज्य सरकारमध्ये कोणत्याही नसताना देखील शरद पवारांवर देखील त्यांनी हल्ला चढवल्याने,त्याचबरोबर ही सगळी लोकं माजलेली आहेत असं वादग्रस्त विधान केलं असल्याने आता नाव वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.