Video: ओवेसी यांनी उत्तर प्रदेश पोलीसांनाच दिली जाहीर सभेत धमकी? म्हणाले मोदी (Narednra Modi) हिमालयात आणि योगी मठात..

0

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता चक्क पोलिसांनाच धमकी दिली असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पोलिसांना दिलेल्या धमकीच्या या व्हिडिओमुळे  सध्या वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ओवेसी यांनी पोलिसांना धमकी दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ओवेसींकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आपण पोलिसांना ही धमकी दिली नाही असे ओवेसी म्हणाले आहेत. ते म्हणाले भाषणातील ठराविक भाग एडिट करुन व्हायरल केला आहे. उत्तर प्रदेश पोलीस मुद्दाम मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचे म्हणत त्यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आपल्या ४५ मिनिटाच्या भाषणातील ठराविक भाग व्हायरल केल्याचे ते म्हणाले.

ओवेसी आपल्या भाषणात काय म्हणाले – उत्तर प्रदेशातील पोलिस मुस्लीमांवर अन्याय करत असल्याचे सांगत ओवेसी यांनी या प्रचारसभेत पोलिसांनाच धमकी दिल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे असा आरोप आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कायमच मुख्यमंत्री नसणार आहेत आणि मोदी (Narednra Modi) हे कायम देशाचे पंतप्रधान नसणार आहेत. पोलिस मुस्लिमांवर अन्याय करत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही. असे ते आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेला अन्याय आमच्या लक्षात राहील. अल्लाह तुम्हाला त्याच्या शक्तीने संपवेल. परिस्थितीमध्ये  बदल होणार आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मठामध्ये जातील आणि नरेंद्र मोदी हिमालयामध्ये जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवेल?,’ असे ओवेसी पोलिसांना उद्देशून म्हणाले असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद  पाहून ओवेसी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ओवेसी यांनी आपल्या भाषणामधील ठराविक काही भाग काढून मुद्दाम व्हायरल केला असल्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे असे ते म्हणाले आहेत. त्यांनी एक ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
“मी हिंसाचाराला बळ मिळेल अशी कोणतीही धमकी दिलेली नाही. मी फक्त पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत बोललो आहे.

पोलिस मुस्लिमांवर करत असलेला अन्याय आक्षेपार्ह असून पोलिसांना कोण संरक्षण देत आहे? मोदी व योगी देत आहेत का?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. परंतु सोशल मीडियावर चुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, असे स्पष्टीकरण ओवेसी यांनी दिले आहे. दरम्यान ओवीसी यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व पक्षांकडून टीका होत आहे.

 

हेही वाचा: आठवतायत का मनसेचे ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील 13 आमदार, जाणून घ्या सविस्तर.. 

पादणं म्हणजे नेमकं असतं तरी काय? त्याला थांबवलं जाऊ शकते का? कशामुळे जास्त वास येतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.