जिल्ह्यातील 55 गावच्या सरपंचांचे सरपंचपद जाणार? सीईओंच्या नोटीशीने खळबळ
सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने जग हादरले आहे. महाराष्ट्र या नव्या ओमिक्रोन वेरियंटने खाते उघडले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. कोरोना पुन्हा एकदा थैमान घालेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
असे असताना गावागावात लसीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. राज्यातील बऱ्याच गावचे सरपंच या मोहिमेसाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर बारामती तालुक्यातील एका सरपंचाने स्वतः जाऊन गावात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस आणून दिली. एकीकडे असे सरपंच आणि दुसरीकडे बिनकामाचे काही सरपंच अगदी निवांत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अशाच गावातील काही सरपंचाना आता जिल्हा परिषद सीईओ यांनी नोटीशी बजावल्या आहेत. त्यात असे म्हटले आहे की कोरोना लसीकरणासाठी गावागावात लस देण्याची मोहीम सुरू आहे. असे असताना सुध्दा बऱ्याच गावचे सरपंच लसीकरणासाठी साथ देत नसल्याने त्यांचे सरपंचपद रद्द का करू नये, अशी नोटीस जिल्हा परिषदेचे सीईओ ( मुख्य कार्यकारी अधिकारी) दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील ५५ गावच्या सरपंचांना बजावल्या आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३ ९ अ नुसार सरपंचांवर कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावल्याने सरपंचांचे धाबे दणाणले आहेत. जिल्यातील गावागावात लसीकरणाची मोहीम सुरू आहे. आशा वर्कर्स त्यासाठी वाड्या वस्त्यांवर जाऊन जनजागृती करण्याचे काम करत आहेत. मात्र सरपंच लसीकरणाचे गांभीर्य बाळगत नसल्याने ही कारवाई करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील सरपंचांना जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नोटीसी बजावल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 5, बार्शी तालुक्यातील 10, करमाळा तालुक्यातील 7, माढा तालुक्यातील 5, माळशिरस तालुक्यातील 5 , मगळवेढा तालुक्यातील 11, मोहोळ तालुक्यातील 11, पंढरपूर तालुक्यातील 5, सांगोला 12, उत्तर सोलापूर 5, आदि गावच्या सरपंचांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत.
अक्कलकोट तालुका – नागणसूर, हैद्रा, मिरजगी, पितापूर, बुऱ्हाणपूर
बार्शी तालुका- भानसाळे, वालवड, चिंचोली, मालेगाव, मांडेगाव
माळशिरस तालुका – शंकरनगर, तोंडले, खळवे, महाळुंग, हनुमान वाडी
अक्कलकोट तालुका – संत दामाजी नगर, नंदूर, बठाण, रहाटेवाडी, मानेवाडी
करमाळा तालुका – उंदरगाव, धायखिंडी, बिटरगाव श्री, पोंधवडी, बिटरगाव
दक्षिण सोलापूर तालुका – रामपूर, फताटेवाडी, शिरवळ, वडजी, वळसंग
उत्तर सोलापूर तालुका – राळेरास, गावडी दारफळ, कवठे, वांगी, अकोलेकाटी
पंढरपूर तालुका – आंबेचिंचोली, विटे, गोपाळपूर, तन्हाळी, सांगवी
मोहोळ तालुका – शेजबाभुळगाव, टाकळी सिकंदर, शेटफळ, वटवटे, अर्जुनसोंड
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम