मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या घरी इडी छापा टाकून कारवाई करणार, एवढंच नव्हे तर..
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे आता खळबळ उडाली आहे. उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे आम्ही न घाबरता आलेल्या सरकारी पाहुण्याचं स्वागत करू असे मलिक म्हणाले आहेत. “गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से” असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
“मी ऐकलंय की आज उद्या माझ्या घरी सरकारी पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आम्ही पाहुण्यांचे स्वागत करू. घाबरणं म्हणजे दररोजचं मरणं आहे. आम्हाला घाबरायचं नाही, तर लढायचं आहे. गांधी गोऱ्यांसोबत लढले, आम्ही चोरांसोबत लढू.” असे ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. नवाब मलिक यांच्या वक्तव्याने आता एकच खळबळ उडाली आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अजुन एक सूचक वक्तव्य केले आहे. ते न्यायालयाच्या अवमान केल्याबाबत ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बोलले आहेत. त्यांनी लाईव्ह लॉ यांचे ट्वीट रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी न्यायालयात काय म्हटलं हे सांगण्यात आलं. यानुसार मलिक म्हणाले, “मला वाटतं माझं वक्तव्य मला केंद्रीय संस्थाचा राजकीय उद्देशाने होत असलेल्या वापरावर आणि आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडताना अधिकाऱ्यांच्या वर्तनावर भाष्य करण्यापासून रोखत नाही.”
मध्यंतरी नवाब मलिक व समीर वानखेडे यांच्यांमध्ये बरीच शाब्दिक चकमक झाली. समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यावर अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीवर एकलपीठातर्फे निर्णय दिला जाईपर्यंत समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. परंतु तरीदेखील आपल्या कुटुंबातील सदस्यांवर आरोपांचे सत्र सुरूच असल्याचे ज्ञानदेव यांनी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती जाधव यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती.
हेही वाचा: अवघ्या ३३ लाखासाठी गड्याने आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं उघड; टोपेंचं मंत्रीपद जाणार हे निश्चित
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम