बाळासाहेबांनी आदेश दिला आणि ‘या’ नेत्याने भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान धावपट्टी खोदली एवढंच नव्हे तर..
1991 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामन्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. बाळासाहेबांच्या आदेशानुसार शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी मग वानखेडेवर जाऊन त्या ठिकाणी धावपट्टी खोदून टाकली होती. एवढंच नव्हे तर धावपट्टीवर ऑईल देखील टाकले होते. त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. पूर्वी बाळासाहेबांनी आदेश दिला की शिवसैनिक तो आदेश पाळून लगेच कामाला लागत असायचे.
पुढे बाळासाहेबांनी शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांना मुंबई महानगरपालिकेत तिकीट दिले. ते नगरसेवक झाले. 1996 ते 2002 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांपैकी शिशिर शिंदे (Shishir Shinde) हे एक. ते मनसेच्या तिकिटावर २००९ मध्ये आमदार झाले. अगोदर शिवसेनेत त्यांनी 24 वर्ष विविध पदांवर काम केले आहे. शिवसेनेत असताना ते राज ठाकरे समर्थक होते. त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना सोडली.
2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिशिर शिंदे यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातून तब्बल १ लाख ९५ हजार मते मिळवली होती. मनसेसाठी ही पहिलीच निवडणुक होती. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे तब्बल 30 हजार मतांच्या फरकाने निवडून आले.
2009 मध्ये विधानसभेत शपथविधीला समाजवादी पक्षाचे अबू आझमी याने मराठीत शपथ घेतली नाही म्हणून मनसे आमदारांनी त्याच्या कानशिलात भडकावली होती. त्यातही शिशिर शिंदे यांचा समावेश होता. 1990 च्या काळात सणासुदीच्या काळात तेलाचा फार तुटवडा जाणवत होता त्यावेळी शिशिर शिंदे यांनी धारा तेलाचे ट्रक आडवून लोकांना तेल वाटले होते.
मनसे पक्षाने त्यांना २०१४ मध्ये संधी दिली मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेने शिशिर शिंदे यांना डावलले. 2012 च्या महानगरपालिका निवडणुकीत शिशिर शिंदे यांनी मनसेविरुद्ध काम केल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळेच राज ठाकरे यांनी त्यांना पद्धतशीरपणे पक्ष निर्णयानुसार बाजूला ठेवले असे देखील मनसे नेते सांगतात. आक्रमकता आणि आंदोलने यासाठी शिशिर शिंदे प्रसिध्द होते.
आपण शिवसेना सोडून मनसेत जाण्याची खूप मोठी चूक केली असे ते म्हणाले होते. शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये जून 2018 मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिवसैनिकांनो मी चुकलो, मला माफ करा. मी 12 वर्षांपूर्वी मनसे सोडून मोठी चूक केली होती असे ते म्हणाले होते.
हेही वाचा: आठवतायत का मनसेचे ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील 13 आमदार, जाणून घ्या सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम