रोहित पवार यांची राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी लागणार वर्णी, एवढंच नव्हे तर रोहित पवार..

0

पुणे प्रतिनिधी| राज्य मंत्रिमंडळात बदल होण्याची हालचाल पाहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून ही जागा भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. या जागेचा निर्णय लवकरच लागणार असल्याची चर्चा वर्तवण्यात येत आहे. याबाबत हालचाली देखील चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

शक्यतो हिवाळी अधिवेशनाच्या आधीच या जागेचा निकाल लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवार घराण्याचे तिसऱ्या पिढीचे राजकीय वारसदार कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू शकते अशी खात्रीशीर माहिती आहे. शरद पवार याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.

रोहित पवारांना कुठले खाते मिळणार?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहखाते शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी कामगार आणि उत्पादन शुल्क खाते होते. आता कामगार आणि उत्पादन शुल्क ही खाती आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे तर रोहित पवार हे मंत्री झाले तर त्यांच्याकडे अहमदनगर विभागाचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित पवार हे अहमदनगरचे नवे पालकमंत्री असतील याचे कारणही तसेच आहे. सध्या हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अहमदनगरचे पालकमंत्री असल्याने कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत आपल्याला अहमदनगरचे पालकमंत्रीपद नको असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. त्यामुळे नगरच्या पालकमंत्री पदावर रोहित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

सध्या कर्जत जामखेड मतदासंघांत रोहित पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग चालू आहे. बरेच कार्यकर्ते भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. रोहित पवार यांचा बोलबाला आता नगर जिल्ह्यात चांगलाच वाढत चालला आहे. त्यात आता पालकमंत्री पदी वर्णी लागल्यास जिल्ह्यात अजून रोहित पवारांचे वजन वाढणार आहे.

हेही वाचा: … तर कांद्याला चांगला बाजारभाव (Onion Price) मिळेल, शेतकऱ्यांनी केली ही मागणी; शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी नक्की कोण खातंय?       

Rohit Pawar: अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष 

धक्कादायक..! देवेंद्र फडणवीस यांचीच एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावली; फडणवीसच सर्वस्वी जबाबदार 

पादणं म्हणजे नेमकं असतं तरी काय? त्याला थांबवलं जाऊ शकते का? कशामुळे जास्त वास येतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.