येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकांमध्ये मनसेच्या कामाची पावती लोक देतील, कारण..

0

महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी देखील स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आपलं तिकीट कापलं जाऊ नये यासाठी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका चालू आहेत. तर काहीजण आपल्याला आता संधी मिळावी असा प्रयत्न करत आहेत.

त्यात मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नाशिकसह मुंबई, पुणे या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला आपला झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी स्वतः राज ठाकरे पुणे, मुंबई मध्ये बैठका घेत आहेत. या निवडणुकांमधील यश मनसेची पुढील दिशा ठरवणार आहे. या निवडणुकांचा निकाल मनसेला २०२४ मधील विधानसभा निवडणुकांची दिशा ठरवणार आहे.

सर्वसामान्य लोकांच्या मोबाईल रिचार्ज पासून, टोलनाका असेल, ते अगदी मोठ्यात मोठ्या प्रश्नांवर मनसे आवाज उठवत असते. सर्वसामान्य लोकांना ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मनसे आवर्जून लोकांच्या पाठीशी उभी रहात असते. त्यामुळे महाराष्ट्रात मनसे पक्षाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो.

आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या आहेत. आंदोलन करून कुठल्याही प्रश्नावर न्याय मिळवायचा ही मनसेची स्टाईल आहे. ही स्टाईल तरुणांना देखील आकर्षित करत असते. त्यामुळे तरुणांची देखील येणाऱ्या निवडणुकीत मनसेला मत पडतील असा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांपासून मनसे पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे.

त्यामुळेच भाजपा नेते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे सोबत युती करण्याचा डाव आखत आहेत. परंतु राज ठाकरे त्यांना किती प्रतिसाद देतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मनसेच्या कामाला जनता किती दाद देणार आहे हे येणाऱ्या निवडणुकांच्या निकालात दिसेलच परंतु सध्यातरी मनसे चमकदार कामगिरी करेल असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या: २०२४ला शिवसेना भाजप सोबत जाणार असल्याचं स्पष्ट; शरद पवारांची खेळी त्यांच्याच अंगलट 

संप मागे नाहीच! एसटी चालवायची असेल तर शरद पवारांनी ड्रायव्हर,अनिल परबांनी घंटी वाजवायची,अजित पवारांनी प्रवासी व्हायचं.. 

मनसैनिकांनो तुमच्यासाठी गोड बातमी, रुपाली ठोंबरे पक्ष सोडणार नाहीत म्हणाल्या; मनसे तर.. 

नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा क्रांती रेडकरला गंडवू लागलाय! प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल बाई खरंच वेडी झाली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.