मनसैनिकांनो तुमच्यासाठी गोड बातमी, रुपाली ठोंबरे पक्ष सोडणार नाहीत म्हणाल्या; मनसे तर..
दोन दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी एका वेब पोर्टलला मुलाखत दिली होती. त्यामधे त्यांनी स्वपक्षीय नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. आपल्याच पक्षातील रिकामटेकडे नेते मला त्रास देत आहेत. मला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. राज साहेबांचे कान भरवत आहेत. मी मर्दानी स्त्री आहे मी गप्प बसणार नाही असे विधान रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले होते.
काल पुन्हा त्यांनी एका न्युज पोर्टलला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला मनसेतील रिकामटेकडे नेते त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. माझ्या विरुद्ध राज ठाकरे यांचे कान भरवण्याचे काम करत आहेत. मला येथील लोकांची कामे सोडून राज साहेबांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. हे किती दिवस चालणार? असा सवाल त्यांनी केला आहे.
मी देखील एक माणूस आहे. मी राज साहेबांना पाहून राजकारणात आले आहे. मी त्यांना माझे दैवत मानते. एक स्त्री म्हणून मला पक्षात त्रास होत आहे. मी हे किती दिवस सहन करणार. मी झाशीची राणीचा आदर्श ठेऊन लढणारी स्त्री आहे. हो मनसेची मर्दानी स्वपक्षीय नेत्यांकडून घायाळ आहे असे देखील रुपाली पाटील म्हणाल्या.
मी २०१७ ला १५ हजार मते घेऊन पडले तरीदेखील मी थांबले नाही. मी राजसाहेब ठाकरे यांना वेळ मागितली मात्र त्यांचा वेळ मिळाला नाही. त्यामुळे मला हे सगळं त्यांच्या कानावर घालता आले नाही. पक्षातील लोकांनी केलेलं गैरवर्तन मी का लपवायचे? माझ्यासोबत असे होत असेल तर मी महिलांना कसे सांगायचे की तुम्ही राजकारणात या असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझे घर. माझा वाद पक्षाशी नाही किंवा पक्ष अध्यक्षांसोबत नाही. माझे खच्चीकरण आमच्याच पक्षातील रिकामटेकडे नेते करत आहेत. वेळ आल्यावर मी त्यांची नावे जाहीर करेल. मी मनसेतच राहणार आहे असे देखील त्यांनी पुन्हा सांगितले आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे त्या म्हणाल्या. परंतु या निमित्ताने पक्षातील रिकामटेकडे नेते कोण? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा: मनसेला मोठा धक्का, राज्य उपाध्यक्ष रुपाली पाटील यांनीच केले पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप
२०२४ला शिवसेना भाजप सोबत जाणार असल्याचं स्पष्ट; शरद पवारांची खेळी त्यांच्याच अंगलट
राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या मावसभावाचा सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून पराभव
मोठी बातमी! शेतकऱ्यांना (Farmer) मिळणार शेतमाल तारण कर्ज, आता शेतकऱ्यांचे काम झाले सोपे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम