PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच बँक खात्यात येणार ‘एवढी’ रक्कम परंतु आधी ‘या’ चुका सुधारा

0

PM Kisan Samman Nidhi: मोदी सरकार शेतकऱ्यांना पुढील महिन्यात खुशखबर देणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) काही छोट्या छोट्या चुका असतील तर लगेचच त्या सुधारा. कारण किसान सन्मान निधीचे पैसे लवकरच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.येत्या डिसेंबर महिन्यात 15 तारखेला शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) दहावा हप्ता जमा होणार आहे.

मोदी सरकार नोंदणीकृत बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. बऱ्याचदा काही छोट्या छोट्या चुकांमुळे शेतकरी बांधवांच्यापर्यंत ही पैशाची मदत पोहचत नाही. या चुकाही योग्यवेळी लगेच नीट करुन घेतल्या पाहिजेत. मागच्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते.

देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी जमा झाला आहे.  1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम सरकारने आतापर्यंत या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना दिली आहे. या वर्षी देखील 15 तारखेला शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दहावा हप्ता जमा होणार आहे. जात कुठल्या शेतकऱ्याने आपले नाव मराठीत लिहिले असेल तर ते बदलवून घ्या.

शेतकरी बांधवांनी त्यांची नावे इंग्रजीमध्येच लिहणे गरजेचे आहे. पंतप्रधान सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अर्ज करताना अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आणि नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक असू नये. तुम्ही तुमचा बँकेचा IFSC कोड अगदी अचूकपणे भरलेला असावा. बँकेचा खाते क्रमांक भरताना देखील कोणतीही चूक करू नये. तुम्ही दिलेला पत्ता बरोबरच आहे ते देखील तपासा.

तुमच्या गावाचे स्पेलिंग जर चुकीचे असेल तरीदेखील या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत. या सर्व छोट्या चुका आधारद्वारे दुरुस्थ करा. जर कोणत्याही प्रकारची चूक झाली तर तुमचे 2,000 रुपये बॅक खात्यात जमा होणार नाहीत. त्यामूळे सर्व महिती व्यवस्थित भरली आहे का याची तपासणी करून घ्या.

या प्रक्रियेसाठी  सर्वप्रथम तुम्हाला  pmkisan.gov.in या सरकारी वेबसाइटवर जावे लागेल. तेथे तुम्हाला वरील बाजूला  Formers Corner ही लिंक दिसेल.  त्या लिंकवर क्लिक करा, त्यांनतर  तुम्हाला आधार संपादनाची लिंक शोधून त्यावर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्या समोर उघडणाऱ्या पेजवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक दुरुस्त करू शकता.

जर तुमचा खाते क्रमांक चुकीचा दिला गेला असेल, तर तुम्ही तो सुध्दा दुरुस्त करू शकता.  यासाठी तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल. तिथे जाऊन तुम्ही याची चूक सुधारू शकता. अश्या प्रकारच्या छोटया चुका दुरूस्त करून या योजनाचा योग्य तुम्हाला लाभ भेटू शकतो. त्यामुळे चूका टाळा आणि योजनेचा फायदा घ्या.

हेही वाचा: Narendra Modi: मोदी सरकार शेवटी झुकलेच, तिनही कृषी कायदे घेतले मागे, परंतु हे नेते म्हणतायत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही कारण.. 

Onion price: गड्याचं डोकं ठिकाणावर आहे का? केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी झाला हवालदिल 

टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार 

शौचालयासाठी मोदींनी कोट्यवधी पैसे खर्च केले; पण कंगणाला उघड्यावर बसू नये हे का सांगितले नाही 

महागाईवरून पंतप्रधानांना सवाल उपस्थित करूनही फरक पडत नसेल तर,लोकांनी कुठे जायचं? स्मृती इराणीच कडाडल्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.