Bhopal: मोदी बनले आदिवासी; प्रसिद्धी आणि मतासाठी नरेंद्र मोदींची पुन्हा ‘नौटंकी’

0

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत कोणीही हात करू शकणार नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या लोकप्रियतेचा यादीत जगभरातल्या अनेक दिग्गजांना पाठीमागे टाकत नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावले. लोकप्रियतेबरोबरच नरेंद्र मोदी यांनी आपल्या नवनवीन लूकसाठी देखील प्रसिद्ध आहेत. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये ‘झाबुआ’वरून आणलेला आदिवासी यांचे पारंपरिक जॅकेट, त्याच बरोबर डिंडोरी वरून आणलेला आदिवासी यांचा ‘साफा’ नरेंद्र मोदी यांनी परिधान केला. नरेंद्र मोदी यांच्या या पेहरावाची चर्चा सध्या शोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या आदिवासी गौरव दिन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहत त्याचा पारंपरिक पोशाख परिधान केल्याने नरेंद्र मोदींच्या या कृत्याची सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी नरेंद्र मोदींवर टीका केली, तर काहींनी कौतुकही केले. नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत अनेक महत्वपूर्ण योजनांचे उद्घाटन देखील केले, आहे

काल दुपारी 1 वाजता भोपाळ येथे नरेंद्र मोदी यांनी ‘आदिवासी गौरव दिन’ महासंमेलनात सहभाग घेतला. ‘शिवराज सिंग चौहान’ सरकारने, नरेंद्र मोदीच्या स्वागतासाठी आदिवासी गौरव दिन सोहळ्याचे औचित्य साधून आधिवासी यांचे पारंपरिक नृत्य सादर करत, मोदींचे स्वागत केले. यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी ‘रेशन तुमच्या ग्राम’ योजनेचा शुभारंभ आणि 50 एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या पायाभरणीसह इतर अनेक उपक्रम सुरू केले जाणार असल्याचे घोषणा केली.

नरेंद्र मोदी यांना या पूर्विदेखील त्यांच्या लूक, आणि वेशभूषा वरून लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले होते. एवढंच नाही तर नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा  निवडणुकीसाठीच त्यांनी भली मोठी दाढी वाढलली असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी वाढवून, त्यांच्यासारखं दिसण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचा, आरोप त्यावेळी विरोधकांकडून करण्यात आला होता.

नरेंद्र मोदी हे नेहमी नौटंकी करत, लोकांना मतदानासाठी आकर्षित करत असतात. असा आरोप सातत्याने विरोधक करताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी केलेल्या वेशभूषेवरुन त्याना ट्रोल केले जात आहे. काल आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय मंत्री आणि आदिवासी नेते ओमप्रकाश धुर्वे यांच्यासह अन्य काही नेते देखील उपस्थित होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.