T20 World Cup final: वीरेंद्र सेवागसह अनेक क्रिकेट दिग्गजांचा अंदाज चुकला; मात्र भाजपाच्या ‘या’ नेत्याचं भाकित ठरलं खरं

0

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. क्रिकेटमध्ये कधी कोणता संघ बाजी मारेल, हे सांगता येणं अवघड आहे. दुबईमध्ये २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन संघ टी-ट्वे्टी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करतील असा अंदाज अनेक क्रिकेट दिग्गजांनी व्यक्त केला होता. मात्र असं काहीही घडलं नाही. सगळ्या दिग्गजांचा अंदाज चुकवत, या स्पर्धेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी फायनलमध्ये धडक मारली. मात्र अनेक दिग्गजांचा अंदाज चुकला असला तरी, भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराने केलेलं भाकीत मात्र खरं ठरलं आहे‌.

दुबईमध्ये सुरू असणारी टी-20 स्पर्धा, सुरु होण्यापूर्वी अनेक क्रिकेट दिग्गजांनी या स्पर्धेचे प्रमुख दावेदार म्हणून इंग्लंड आणि भारताकडे पाहिलं होतं. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हे दोन संघ जाण्याची दाट शक्यता असून, यामध्ये भारत विश्वविजेता ठरेल, असा देखील अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र ही स्पर्धा सुरू झाली, आणि पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तान संघाने धुव्वा उडवला. आणि सगळीच समीकरणे बदलल्याचे पाहिल्या मिळाले.

पाकिस्तान (Pakistan)संघाने सर्वांनाच आश्चर्यचकित करत,या स्पर्धेत धमाकेदार एंट्री केली. या स्पर्धेत साखळी सामन्यात पाकिस्तान संघ एकही सामना पराभूत न होणारी पहिली टिम ठरली. पहिले पाचही सामने पाकिस्तानने सहज जिंकत या स्पर्धेचे आपणच दावेदार असल्याचं सिद्ध केले. तर दुसऱ्या गटात इंग्लंडने आपला एक सामना गमावला मात्र ते देखील उत्कृष्ट क्रिकेट खेळले. दोघांच्या खेळाचे विश्लेषण करताना क्रिकेट दिग्गजांनी हे दोन संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला. मात्र घडलं उलटच, या दोन्हीं संघाला सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्करावा लागला, आणि या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. (AUSvPAK)

कसोटी ओपनर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने(aakash Chopra) आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक ट्वीट करत लोडींग, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी ट्वेंटी फायनल असं ट्वीट केलं होतं. तर दुसरीकडे त्याचाच साथीदार आणि नझबगडचा नवाब म्हणून ओळख असणाऱ्या धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) देखील इंग्लंड आणि पाकिस्तान विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करतील,असे भाकीत केले होते. फक्त भारताच्याच नाही तर जगातील अनेक दिग्गजांनी हे दोन संघच फायनलमध्ये प्रवेश करतील असं भाकित केलं होतं.

मात्र या सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन आपलं भाकित खरं करून दाखवणारा देखील भारताचा एक खेळाडू होता. आता त्याचं अनेक चाहत्यांकडून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर आहे. (Gautam Gambhir)भारतीय संघाने जे दोन विश्वचषक जिंकले,त्या टी-20 आणि वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा गौतम गंभीरने केल्या होत्या.

भारताला दोन्हीं विश्वचषक जिंकून देण्यात सिहाचा वाटा असणाऱ्या गौतम गंभीरने दुबईमध्ये सुरु असलेल्या टी-ट्वेंटी स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन संघ पोहचतील, असे भाकित केले होते. न्यूझीलंडने इंग्लंडला तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करून या दोन्हीं संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. गंभीरने केलेले हे भाकीत खरे ठरल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी गौतम गंभीरचे कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.