BCCI: ‘सपोर्ट स्टाफ’ निवडीवर राहुल द्रविडचा प्रभाव; द्रविडच्या ‘या’ दोन खास व्यक्तींची बॅटिंग आणि बॉलिंगच्या प्रशिक्षकपदी निवड

0

गेल्या काही महिन्यांपासून राहुल द्रविडची (Rahul Dravid) भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी (head coach) निवड होणार असल्याच्या चर्चा चांगल्याच गाजल्या होत्या. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडची या पदासाठी निवड व्हावी, अशी अनेक क्रिकेट चाहत्यांची इच्छा होती. अखेर राहुल द्रविडची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली, आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. राहुल द्रविडच्या सोबस ‘सपोर्ट स्टाफ’म्हणून कोणाकोणाला संधी मिळणार? याची देखील उत्सुकता लागून राहिली होती. मात्र भारतीय संघाच्या बॅटिंग, बोलिंग, आणि फिल्डिंगच्या कोचची आज निवड केली जाणार असल्याने, ही प्रतीक्षा देखील आता संपुष्टात येणार आहे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज भारतीय संघाच्या बिल्डिंग आणि बॅटिंग कोणाची निवड केली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. नाहीतर या तिन्ही प्रशिक्षकांची नावेदेखील समोर आली आहेत. आज संध्याकाळपर्यंत भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ घोषित करण्यात येईल. जर संध्याकाळपर्यंत घोषणा झाली नाही, तर उद्या सकाळी-सकाळी क्रिकेट चाहत्यांना ‘सपोर्ट स्टाफ’ची नावे पाहायला मिळतील. अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बीसीसीआयचे अधिकारी, राहुल द्रविडला अनेक महिन्यांपासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद तु सांभाळ अशी विनंती करत होते. मात्र राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक भूषवण्यासाठी अनुकूल नव्हता, अशा बातम्याही माध्यमांमधून आल्या होत्या. अखेर राहुल द्रविडने बीसीसीआयचे विनंती मान्य करत मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्यासाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर, राहुल द्रविडची निवड करण्यात आली.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची निवड करताना, बीसीसीआयने द्रविडला मोकळी सूट दिल्याची माहिती मिळते. राहुल द्रविड त्याला हवा असणाऱ्या संघासोबत तो काम करू शकतो. अशी देखील माहीती मिळते. भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफ निवडीवर राहुल द्रविडचा प्रभाव पडल्याचे पाहायला मिळतं. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाच्या बॉलींग कोचपदी पारस म्हांब्रेची निवड केली जाणार असल्याची माहिती मिळते. पारस म्हांब्रे(Paras) हे नॅशनल क्रिकेट अकादमी सोबत गेल्या दहा वर्षांपासून काम करतोय. राहुल द्रविडचा तो खास सहकारी असल्याचीही माहिती मिळते.

भारतीय संघासोबत सध्या ‘बॅटिंग कोच’ म्हणून काम करत असणारे, विक्रम राठोड (Vikram Rathod)यांची पुन्हा एकदा भारतीय संघाच्या ‘बॅटिंग’ कोचपदी निवड होण्याची शक्यता आहे. विक्रम राठोड हा देखील राहुल द्रविडचा खास माणूस समजला जातो.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.