T20 World Cup 2021: २०१९ मध्ये झालेल्या पराभवाची ‘सव्याज’ परतफेड करणार; केन विल्यमसनचा निर्धार

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकातला पहिला सेमीफायनल सामना आज अबूधाबी क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता खेळविण्यात येणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज होणाऱ्या पहिला सेमी फायनल (semi final1 ENG vNZ) सामन्यात टॉस खूप मोठा फॅक्टर ठरणार आहे. क्रिकेटचे अनेक दिग्गज या सामन्यात इंग्लंड संघ फेवरेट मानत असले तरी, जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांची न्यूझीलंड संघ जिंकावा अशीच इच्छा असणार आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये 2019 विश्वचषकाचा झालेला फायनल आजही लोकांच्या स्मरणात राहिला आहे. वास्तविक पाहता ही मॅच न्यूझीलंड संघाने जिंकली होती. मात्र मार्टिन गुप्टिलने टाकलेला थ्रो बेन स्टोकच्या बॅटला लागून चौकार झाला. आणि इथेच या सामन्याचे पारडं इंग्लंड संघाच्या बाजूने झुकले. एवढं सगळं होऊन देखील, न्यूझीलंडचा कॅप्टन ‘केन विल्यम्सनने’ आपला संयम न गमवता सामना बरोबरीत सोडला.

५० षटकांच्या विश्वचषकाचा निकाल लावण्यासाठी आता सुपर ओवर खेळायची वेळ या दोन्हीं संघावर आली होती. सुपर ओव्हर देखील टाई झाली. आणि या सामन्यात सगळ्यात जास्त चौकार मारणाऱ्या संघाला विश्वविजेता घोषित करण्यात आलं. अनेक क्रिकेट चाहत्यांची इच्छा न्यूझीलंड संघ जिंकावा अशीच होती, कारण हा सामना जवळपास न्युझीलंड संघाने जिंकला होता. मात्र चुकून थ्रो केलेला चेंडू बेन स्टोकच्या ‘बॅट’ला लागून चौकार गेल्याने हा सामना फिरला. क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

मात्र या पराभवाची परतफेड करण्याची संधी न्यूझीलंड संघाकडे आली आहे. क्रिकेट दिग्गजांच्या म्हणण्यानुसार इंग्लंड संघ या सामन्यात ‘फेवरेट’ मानला जात असला तरी, न्युझीलंड संघ हा कधीही हार न मानणारा संघ असल्यामुळे ही लढत तुल्यबळ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी ‘दव’ पडत असल्यामुळे ‘टॉस’ हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असं म्हटलं जातं,महत्त्वाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून मोकळे व्हा. कारण धावांचा पाठलाग करणं महत्त्वाच्या सामन्यात दबाव असल्याने अवघड जातं.

मात्र दुबईमध्ये ‘दव‘ पडत असल्यामुळे धावांचा पाठलाग करणं, सोप्प झाल्याचं आतापर्यंतच्या सामन्यात पाहायला मिळालं आहे. त्यामुळे जो संघ प्रथम टॉस जिंकेल तो संघ गोलंदाजीच निवडणार यात अजिबात शंका नाही. दोन्हीं संघांच्या जमेच्या बाजूचा विचार केला तर, इंग्लड संघाकडे फायर पॉवर फलंदाजी आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाकडे उत्कृष्ट दर्जाचे स्विंग गोलंदाज आहेत.

गेल्या काही वर्षापासून इंग्लंड संघाच्या खेळाची पद्धत पाहिली तर, सुरुवातीपासूनच ते अटॅकिंग क्रिकेट खेळतात. मैदानात येणारा प्रत्येक खेळाडू फायर हिटिंग करताना पाहायला मिळतो. अशावेळी इंग्लंडचा संघ कोलॅप्स होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. २०१९च्या विश्वचषकामध्ये देखील इंग्लंडचा संघ कोलॅप्स होताना पाहिला मिळाला होता. दुसरीकडे न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर ते परसंटेज क्रिकेट खेळतात.

एक क्रिकेट विश्लेषक म्हणून मला वाटतं, न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करून जर १५५ ते १६५ धावांचा टप्पा गाठला तर, इंग्लंडच्या संघाला या धावांचा पाठलाग करणं कठीण जाईल. मात्र जर इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली तर, ते मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता जास्त वाटतेय. २०१९च्या विश्‍वचषका प्रमाणे, आजचा सामना देखील एक ऐतिहासिक सामना म्हणून नोंद होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

यातून निवडले जाणार दोन्हीं संघ;

इंग्लंड: जोस बटलर (विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, मोईन अली, इऑन मॉर्गन (कॅप्टन’), सॅम बिलिंग्ज, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, मार्क वुड, आदिल रशीद न्यूझीलंड संघ; मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (कॅप्टन’), डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने टिम साउथी, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.