पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त; आकडेवारीचा विचार केला तर, तुम्ही म्हणाल मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का

0

रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे देशातील जनता महागाईमुळे त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. देशाच्या इतिहासात पेट्रोलने पहिल्यांदाच शंभरी ओलांडली. पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाट वाढल्याने मोदी सरकारवर सातत्याने विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र आज केंद्र सरकारने पेट्रोल कर कपात पाच रुपयांनी तर डिझेल वरील करकपात दहा रुपयांनी कमी करत थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे नवीन नियम आज रात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती आहे.

सर्वसामान्यांपासून अनेक बड्या मंडळींना इंधन दरवाढीचा फटका बसतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीकडे सर्वांचे लक्ष असतं. शेतकऱ्यांपासून ते बड्या उद्योगपतीनाही इंधन दरवाढीचा फटका बसतो, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. इंधनाच्या दरवाढीवर अनेक घटक अवलंबून असतात. इंधन दरवाढीमुळे प्रवास, ट्रान्सपोर्ट, खर्च वाढत असल्याने याचा अप्रतेक्ष फटका अनेक घटकांवर बसतो.

देशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा फटका बसला. बीजेपीची सत्ता असणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्ये देखील पोटनिवडणुकीच्या चार जागांवर काँग्रेसने बाजी मारली. आणि बीजेपीला मोठा धक्का बसला. एवढेच नाही तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी या पराभवाचे खापर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर काढले. एक लोकसभा आणि तीन विधानसभा पोटनिवडूकीच्या जागा जिंकत काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ केला. कदाचित यामुळेच हा निर्णय घेतला असावा असं बोललं जातंय.

उत्तर प्रदेशसह अनेक महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचंही आता बोललं जाऊ लागलं आहे. पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची धास्ती भारतीय जनता पार्टीने घेतल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळेच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात कर कपात केली असल्याचं अनेकांकडून सांगण्यात येते आहे. पेट्रोल पाच आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होणार असलं तरी, गेल्या वर्षभराची आकडेवारी पाहिली तर अनेकांना धक्का बसेल.

आकडेवारींचा विचार केला तर, गेल्या वर्षभरापासून इंधनाचे दर जवळपास चौतीस रुपयांनी महागल्याचे आपल्याला पाहायला मिळते. केंद्र सरकारने पेट्रोलचे दर रोज थोडे थोडे करून वर्षभरात तब्बल ३४ रुपयांनी वाढवले आहेत, तर दुसरीकडे एक जानेवारीपासून आतापर्यंत डिझेल बत्तीस रुपयांनी वाढवण्याचे पाहायला मिळतं. जानेवारीत पेट्रोलचा दर साधारण ८३ ते ८४रुपये होता. तर डीझेलचा दर ७४ रुपये होता. आता डिझेलचा दर १०५ रुपयांवर आणि पेट्रोल ११६ वर पोहचले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.