Raju parulekar: वानखेडे त्यांच्या साथीदारांना खंडणी,अपहरण प्रकरणात अटक करा अन्यथा कायद्यावरचा विश्वास उडेल

0

गेल्या महिनाभरापासून आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरण कमालीचे चर्चेत आहे. आता या प्रकरणाचा हळूहळू उलगडा होताना पाहायला मिळत आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरण जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अनेकांकडून करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ लेखक आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर (Raju parulekar) यांनीही या प्रकरणात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून समीर वानखेडे आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्याची मागणी केली आहे.

दोन ऑक्टोबरला कार्डिलिया क्रुझवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी छापा टाकत, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. तेव्हापासून हे प्रकरण वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आर्यन खानच्या हाताला पकडून एनसीसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती हा एनसीबीचा कोणताही अधिकारी नसल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणावर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.

आर्यन खान ड्रग्स (Aryan Khan Drug case) प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा, प्रभाकर साईलने काही धक्कादायक खुलासे केल्यानंतर,यात काहीतरी काळंबेरं असल्याचं बोललं जाऊ लागले. किरण गोसावी आणि ‘सॅम डिसूजा’ या दोघांमध्ये 25 कोटी रुपयांची बोलणी झाली होती, तर अठरा कोटी रुपयांवर ही ” करू कारण यातले आठ कोटी आपल्याला समीर वानखेडेंलाही द्यायचे आहेत, असं देखील हे दोघे एकमेकांशी बोलताना म्हणाले होते. असा खळबळजनक दावा प्रभाकर साल्याने ॲफिडेव्हिट मार्फत केला. आणि एकच खळबळ उडाली.

प्रभाकर साहिल यांनी केलेले आरोप किरण गोसावीने फेटाळून लावत, अशी कोणतीही डील झाली नव्हती, पैसे प्रभाकर साईल आणि त्याच्या भावानेच घेतले असल्याचं म्हटलं. पुढे काही दिवसांनी सॅम डिसूजा याने किरण गोसावी हा ‘फ्रॉड’ असून पैशाची मागणी त्याने केली होती याची आपल्याला माहीत नसल्याचा खुलासा केला. आणि पुन्हा एकदा समीर वानखेडे अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले.

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानवर एनसीबी(NCB) अधिकारी समीर वानखेडे यांनी कारवाई केली, मात्र किरण गोसावी, प्रभाकर साईल, सॅम डिसूजा,मनीष भानुशाली ही मंडळी कशी आणि कुठून आली? या प्रश्नाचे उत्तर अजूनही देशाला मिळाले नाही. आणि याचाच हवाला देत जेष्ठ लेखक आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी या सगळ्यांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

किरण गोसावी, सॅम डिसूजा,मनीष भानुशाली आणि समीर वानखेडे यांच्यावर जर आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर,लोकांचा कायद्याच्या राज्यावर असणारा विश्वासच उडेल, असं देखील राजू परूळेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.