Priyanka Chopra: लग्नाच्या सुरुवातीला ‘निक जोनस’ रात्रभर झोपू देत नव्हता; प्रियंका चोप्राने व्यक्त केली खंत
देसी गर्ल म्हणून बॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राने (priyanka Chopra) अमेरिकेचा स्टार सिंगर अभिनेता निक जोनसशी लग्न केले. हे दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी असल्याचे दिसून येते. मात्र लग्नानंतर प्रियांकाला तिच्या कुंकवाचा धनी ‘निक जोनस'(Nick Jonas) तिला रात्रभर झोपू देत नव्हता. हे तुम्हाला माहीत आहे का?
देसी गर्ल प्रियांका चोपडा बॉलिवुड सोडून हॉलिूडमध्ये आपले करिअर करण्यासाठी गेली असताना, तिची ओळख निक जोनस याच्याशी झाली. पुढे या दोघांच्या भेटी वडू लागल्या. आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र कालांतराने या प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले. आणि दोघेही कायद्याने पती पत्नी म्हणून जगासमोर आले. दोघांच्या लग्नची चर्चाही त्यावेळी प्रचंड गाजली. आता ही जोडपं प्रचंड पॉप्युलर असून,या दोघांना अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात सोबत मस्ती करताना पाहायला मिळते.
अमेरिकन गायक आणि प्रसिद्ध गीतकार निक जोनस हा वयाने त्याची पत्नी प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. प्रियांकाने आपल्या पेक्षा वयाने १० वर्षांनी लहान असणाऱ्या कोवळ्या पोरासोबत लग्न केलं आहे. मात्र तरीदेखील ती खूप आनंदात असल्याचे पाहिला मिळते. कोणताही interview देताना ती आपल्या नवऱ्याला लगेच किस करताना आपण अनेकदा पहिलं असेल. मात्र लग्नानंतर प्रियांकाला अनेक वेळा रात्र-रात्र झोप लागली नाही. त्याचं कारण जाणून तुम्हाला आश्र्चर्य वाटेल.
निक जोनस हा आपल्या आरोग्याविषयी प्रचंड काळजी घेत असतो. आपल्या फिटनेस बाबत तो नेहमी सतर्क असतो. मात्र निक जोनस याला पहिल्यापासूनच साखरेचा आजार आहे. त्याचा हा आजार प्रियांकाला लग्ना अगोदर माहितीही होता. मात्र तरीदेखील तिने त्याच्याशी लग्न केले. मात्र लग्नानंतर या आजाराचा त्रास देखील तिला सहन करावा लागला. कधी कधी रात्री निक जोनसला साखरेच्या आजाराचा त्रास होत असल्याने, प्रियंकाला रात्रभर झोप लागायची नाही, ती त्याची काळजी करत बसायची. असं तिने एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले आहे.
तुम्ही म्हणाल पत्नीने पतीची काळजी करणं, हा तिचा धर्म असतो. ती त्याची काळजी करत असेल, एखाद दुसरी रात्र झोपली नसेल, जागी राहिली असेल, यात विशेष असं काय आहे? मात्र अमेरिकेत पत्नीने पतीची काळजी घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या देशाप्रमाणे पती पत्नीच्या नात्याला पवित्र मानलं जातंच असं नाही. प्रियंका चोपडाने तिचा नवरा निक जोनसची काळजी सुरुवातीच्या काळात घेतली, ही एक मोठी गोष्ट निकच्या कुटुंबाने देखील मानली होती, असं एका मुलाखतीत प्रियांकाने सांगितलं.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम