होऊदे व्हायरल; पापा बाहर ‘बारिश’ हो रही है… नहीं बेटा बीजेपी पर पूरा देश ‘थूक’ रहा है..

पंचवीस वर्षे एकत्र संसार थाटल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. फक्त युतीच तुटली नाही, तर हे दोन विरोधी पक्ष आता एकमेकांवर गरळ ओळखतानाही पाहायला मिळते. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विरुद्ध दिशेने गेले असल्याने राजकारणात यापुढे, हे एकत्र लढतील की नाही? हा मोठा प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर, राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. मात्र अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे चांगलच बिनसलं असून यापुढे राजकारणात आता हे दोघे एकत्र लढतील याची शक्यताही फार कमी आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने आपली वेगळी भूमिका घेतल्याने भाजप अडचणीत आलं. निकाल लागले लागल्याच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं जाहीर केलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी भाजप सोबत झालेली युतीच शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष राहणार यावर झाली होती. असं जाहीर केलं होतं.

मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद या विषयावर कोणतीही बोलणी झाली, नसल्याचं भाजपकडून सांगण्यात आले. दुसरीकडे सेना मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्री पदासाठी अडून राहिली. आणि महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार न येता राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन विरुद्ध विचारांचे प्रश्न एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसतानाही शरद पवार यांनी आग्रह केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागेली.

विकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही व खास करून भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा मंत्र्यांना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याचे दिसून आले. भारतीय जनता पार्टीने नुकतेच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं. हे मंत्रीपद नारायण राणे यांना शिवसेनेवर टीका करण्यासाठीच दिलं असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं.

दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच दोन्ही पक्षांचे समर्थक देखील एकमेकांवर भेटल्याचे अनेक वेळा सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्षरित्या देखील पाहायला मिळाले. आज देखील सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एक भाजपावर हल्लाबोल करणारं मीम्स बनवण्यात आलं आहे. सध्या मी अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून. हे मीन्स चर्चेचा विषय बनलं आहे.

आदित्य ठाकरे आपल्या वडिलांना सांगताहेत, बाबा आज बाहेर पाऊस खूप पडतोय. यावर उद्धव ठाकरे म्हणत आहेत, अरे तो पाऊस नाही, भारतीय जनता पार्टीवर संपूर्ण देश थुंकतो आहे. हे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झालं आहे.

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.