Maharashtra Police Bharati: सोमेश्वर येथील विवेकानंद अभ्यासिकेतील तिघांना महाराष्ट्र पोलीस भरतीत मिळाले यश

0

विवेकानंद अभ्यासिकेतील सध्या चालू असलेल्या २०१९ च्या (Maharashtra Police Bharati) पोलीस भरती प्रक्रीयेमधून SRPF ग्रुप नं ५ मधून अक्षय होळकर २०० पैकी तब्बल १९४ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकाने भरती झाला होता. पुन्हा एकदा अभ्यासिकेतील दोघांना काल रायगड शहर पोलीस भरतीमध्ये यश मिळाले आहे. अभ्यासिकेतील दोघेजण रायगड शहर पोलीस दलात भरती झाली आहेत.

अजय संजय होळकर यांची OBC प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने निवड झाली व केतन इंगळे यांची EWS
प्रवर्गातून तिसऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे. अजयला १५० पैकी तब्बल १२४ मार्क्स
मिळाले व केतन ला १५० पैकी १२६ मार्क्स मिळाले आहेत. अक्षय होळकर, अजय होळकर व केतन इंगळे हे तिघेही गेली ४ वर्ष पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत होते.

२०१९ मध्ये रायगड शहर पोलीस भरतीची जाहिरात निघाली होती. भरती प्रक्रिया कोरोना मुळे लांबणीवर पडली होती. परंतु सप्टेंबर २०२१ मध्ये भरतीच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. काल २८ ऑक्टोबरला रायगड शहर पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. हे यश मुलांनी खूप खडतर परिश्रम करून आणि संयम ठेवून मिळवले आहे. पोलीस भरतीमध्ये यश मिळालेले तिघेही सर्वसामन्य कुटुंबातून आहेत.

तिघांनी १२वी नंतर पुढील शिक्षणाला प्रवेश घेऊन पोलीस भरती आणि आर्मी भरतीच्या तयारी सुरुवात केली. अक्षय होळकर याने हे यश दुसऱ्या भरती मध्येच मिळवले आहे. परंतु अजय आणि केतन या दोघांना यश मिळवण्यासाठी  थोड्या थोड्या गुणांनी हुलकावणी दिली होती. अजय होळकर हा मार्च २०२१ मध्ये BSF मध्ये भरती झाला होता. परंतु महाराष्ट्र पोलीस भरती होण्याचे अजयचे स्वप्न असल्यामुळे त्याने नोकरी करण्याचे ठरवले.

अजयचा स्वतःवर व त्याच्या प्रयत्नांवर विश्वास होता  आणि तो त्याने खरा करून दाखवला. केतन इंगळे याने सुध्दा आर्मी मध्ये भरती होण्यासाठी खूप प्रयत्न केले. तो तब्बल ६ वेळा मेडिकल पर्यंत जाऊन आला. २०१८ च्या पोलीस भरतीमध्ये थोडक्यात त्याला यशाने हुलकावणी दिली होती. त्याने पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर यश मिळवले.

या तिघांच्या यशामध्ये त्यांचे कुटुंब, मित्र आणि त्यांचे मार्गदर्शक गणेश सावंत सरांचा मोलाचा वाटा आहे. २०१७ ला या तिघांनी  विवेकानंद अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेतला होता. आम्हाला मिळालेल्या यशामध्ये गणेश सावंत सरांचे मार्गदर्शन व सहकार्य खूप मोलाचे ठरले अशी प्रतिक्रिया अक्षय होळकर, अजय होळकर व केतन इंगळे यांनी दिली.

विवेकानंद अभ्यासिकेचे संस्थापक आणि मार्गदर्शक गणेश सावंत सर यांनी ”विश्वासास पात्र ठरलात मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो” अशी प्रतिक्रिया गणेश सावंत यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली आहे. पोलीस भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या मुलांनी संयमी, मेहनती व जिद्दी असायला हवे. तुमच्यात मेहनत करण्याची ताकत असेल तर कोणच तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, असे देखील गणेश सावंत सर म्हणाले.

हेही वाचा: सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवलेले संचालक सुनिल भगत यांचा राजकीय प्रवास 

रायगड शहर पोलीस भरतीमध्ये अजय होळकर यांना यश, 150 पैकी तब्बल 124 गुण मिळवून प्रथम क्रमांक 

विश्वास नांगरे पाटीलांनी तपास पथक तयार करताच समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अटकेच्या भितीने वानखेडे हादरले 

 हे फक्त छत्रपतींचा वारसा असणाऱ्या राजधानी साताऱ्यात होऊ शकतं; शाहरुख यांचं होतंय सर्व स्तरातून कौतुक

बारामती तालुक्यातील महत्वाच्या बातम्या व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी खालील व्हॉट्सॲप फोटोवर क्लिक करा. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.