आश्चर्यकारक! दादासाहेब फाळके सारखा उच्च पुरस्कार रजनीकांतने का केला ड्रायव्हरला समर्पित?वाचा सविस्तर

0

काजल पाटील, पुणे प्रतिनिधी

ॲक्शन, इमोशन आणि ड्रामा अशा प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेने आपल्या चाहत्यांची मने जिंकनाऱ्या यादीमध्ये सुपरस्टार रजनीकांतचा पहिला क्रमांक हमखास लागतो. रजनीकांत चे चाहते त्यांच्यावर येवढे निखळ प्रेम करतात की अनेक ठिकठिकाणी त्यांची पोस्टबाजी तर दिसतेच पण चक्क मंदिरे सुध्दा बांधली आहेत. रजनीकांतला या यशापर्यंत आणि स्टारडमपर्यंत घेऊन जाणार कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

तुम्ही वाचून आश्चर्यचकित व्हाल, तो म्हणजे ड्रायव्हर राज बहादूर ज्याला सुपरस्टार रजनीकांतने आपला मिळालेला पुरस्कार समर्पित केला आहे. येवढ्यातच संपन्न झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘थलैवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. अनेक जण हा पुरस्कार शक्यतो त्यांच्या कुटुंबीयांना किंवा गुरूला समर्पित करतात, परंतु सुपरस्टार रजनीकांत यांनी हा पुरस्कार त्यांचे जुने जिवलग असलेले मित्र राज बहादूर यांना समर्पित केला आहे.

रजनीकांत यांनी जुन्या अशा काही आठवणी सांगितल्या की सर्व लोकांचे डोळे पाणावले. त्यांनी त्यांच्या या मित्राबदल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या या मैत्रीतील प्रेम पाहुन सर्वजण स्तब्द झाले. तेथे बसलेल्या सर्वजणांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आपण ज्यांना थलैवा’ रजनीकांत असे वेगवेगळ्या नावाने ओळखतो ते या उंचीपर्यंत पोहोचणार आहेत हे तेंव्हा फक्त राज बहादूरने ओळखले होते. त्यांनी रजनीकांतचे ते कौशल्य ओळखले होते.

ही गोष्ट त्यावेळची आहे, जेव्हा रजनीकांत बस कंडक्टर होते. आणि त्यांचा जिवलग मित्र राज बहादूर त्या बसचा चालक असायचा. आज पडद्यावर ज्यांना आपण महान नायक असे ओळखतो. तो राज बहादूरच्या पारखीचा चमत्कार आहे. राज बहादूर आणि रजनीकांत या दोघांच्या मैत्रीला 50 वर्षे झाली आहेत.

तरी आजही त्यांच्या मैत्रीत तोच जिव्हाळा आणि आपुलकी त्यांनी जपून ठेवली आहे.  रजनीकांत ही मैत्री आजपण पूर्ण निष्ठेने निभावतात. कारण राज बहादूर यांनीच शिवाजी राव गायकवाड या साध्या बस कंडक्टरला रजनीकांत’ बनवले, त्यांना तमिळमध्ये बोलायला शिकवले. या मैत्रीबद्दल एका मुलाखतीत बोलताना राज बहादूर सांगितले की, आमची मैत्री 50 वर्ष जुनी आहे. त्यांची आणि रजनीकांतची ओळख 1970 मध्ये झाली.

त्यावेळी रजनीकांत बस कंडक्टर म्हणून काम करायचे आणि राज बहादूर ड्रायव्हर होते. ते म्हणाले आमचा जेवढा ट्रान्सपोर्ट स्टाफ होता. त्या सर्वांमध्ये रजनीकांत हा सर्वोत्कृष्ट अभिनेता होता.  आमच्या विभागात जेव्हा कधी कार्यक्रम असायचा तेव्हा रजनी रंगमंचावर आपल्या  स्वतःच्या अभिनयाने सगळ्यांचे  उत्तम मनोरंजन करत असायचे. रजनीकांतला अजून उत्तम अभिनय यावा यासाठी राज बहादूर यांनी मित्राला अभिनय शाळेत पाठवले, तमिळ शिकवले.

राज बहादूर म्हणाले, ‘त्यावेळी मी रजनीला चेन्नईला जाऊन अभिनय शाळेत जाण्यासाठी सांगितले होते.
2 वर्षांचा अभ्यासक्रम संपल्यानंतर त्या संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता .ज्यामध्ये चित्रपट निर्माते के बालचंदर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.  त्यांना रजनीचा अभिनय खुप आवडला होता .त्यांनी त्याला तमिळ शिकण्यास सांगितले.  तेवढ्यात रजनी माझ्याकडे आला मग मी रजनीला काळजी करू नकोस असे सांगितले. मंग आम्ही ठरवले  की आतापासून रोज  एकमेकांबरोबर  फक्त तामिळमध्ये बोलायचं.

एवढेच नव्हे तर रजनीकांतला आपल्या परीने जेवढी मदत करता येइल, तेवढी राज बहदुर या त्यांच्या जिवलग मित्राने केली. कठीण काळात रजनीकांत यांच्या पुढे राज बहादुर ढालीसारखे उभे राहिले. रजनीकांत यांना अभिनय शाळेचा खर्च भागवण्यासाठी अर्धा पगार म्हणजेच 200 रुपये ते पाठवत असायचे .त्यांच्यापरी जेवढी जमेल तेवढी मदत त्यांनी केली. त्यामूळे तर रजनीकांतने त्यांच्या या हिर्‍यासारख्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करत दादासाहेब फाळके सारखा मोठा पुरस्कार समर्पित केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.