आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नव्या पात्राची ‘एन्ट्री’; प्रसिद्ध ‘हॅकर’ मनीष भंगाळेच्या ‘या’ दाव्याने देशच हादरून गेलाय…

0

एखाद्या चित्रपटाला लाजवेल असं, कथानक आर्यन खान ड्रग्स प्रकरणाच्या माध्यमातून संपूर्ण देश पाहात आहे. अजूनही ‘आर्यन खान’ ड्रग्स प्रकरणाचा तिढा काही सुटता सुटेना. रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असून, रोज कोणाची ना कोणाची या प्रकरणात एट्री होताना पाहायला मिळते. आता या प्रकरणात प्रसिद्ध ‘हॅकर’ मनीष भंगाळेची एन्ट्री झाली असून, त्यांनी असे काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशच हादरून गेला आहे.

मुंबईच्या कार्डिलिया ‘क्रुझवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. प्रकरणाचा जसजसा तपास होत गेला, तसतसा या प्रकरणाचा खुलासा व्हायला सुरुवात झाली. बॉलिवूडचा ‘किंग’ खान शाहरुख याच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक केली. ही बातमी देशाची हेडलाईन बनली.

परंतु आता मात्र आर्यन खानवरचा सगळा फोकस समीर वानखेडे यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणात कारवाई केली आहे, याकडे वळला असून प्रत्येकाला या प्रकरणात नेमकं काय झालंय? यांची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. आर्यन खानच्या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा ‘प्रभाकर साईल’ यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर येत, या प्रकरणात काही महत्त्वाचे खुलासे केल्याने, खळबळ उडाली होती. तेव्हापासून या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीची या प्रकरणात एन्ट्री झाली आहे.

जळगावच्या प्रसिद्ध ‘हॅकर मनीष भंगाळे’ यांची या प्रकरणात एन्ट्री झाली असून, अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोघांनी मला व्हाट्सअप बॅकअप चॅटमध्ये छेडछाड करण्यासाठी पाच लाख रुपयांची ऑफर दिली असल्याचा, खळबळजनक दावा ‘भंगाळे’ यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रभाकर साईल यांनी सॅम डिसूजा आणि किरण गोसावी या दोघांमध्ये २५ कोटीचा बॉम्ब टाकल्याची चर्चा झाल्याचा दावा केला होता. तर १८ कोटींमध्ये ही डिल करू,असं बोलणं चालू होतं. यातले ८ कोटी एनसीबीचे अधिकारी ‘समीर वानखेडे’ यांना द्यावे लागतील असं, या दोघांचं बोलणं झाल्याचं, प्रभाकर साईल याने एका एफिडेविटमध्ये म्हटले होते. प्रभाकर साहिल यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाचा सगळा फोकस ‘समीर वानखेडें’कडे वळला. आणि तेव्हापासून या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.

एनसीबीचा कुठलाही संबंधित अधिकारी नसताना, किरण गोसावी हा आर्यन खानच्या हातला पकडून एनसीबी ऑफिसमध्ये घेऊन जाताना पाहिले गेल्याने, सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर या प्रकरणाचा कसलाही संबंध नसणारा, आणि मुंबई तसेच देशाचा मनी लॉन्ड्रिंगचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा, सॅम डिसूझा’ एनसीबी ऑफिसमध्ये आर्यन खान जवळ काय करत होता? त्याचबरोबर कार्डिलिया क्रुझवर छापा टाकण्यापूर्वीच, किरण गोसावी आणि सॅम डिसूझाने एनसीबी कार्यालयाला भेट का दिली? असे अनेक असंख्य प्रश्न उभे राहिले. आणि समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

फरार असणारा किरण गोसावी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी फोनवर बोलताना म्हणाला, प्रभाकर साईल याने केलेले सगळे आरोप खोटे असून, तो प्रोपोगंडा करत आहे. मात्र त्याने माध्यमांशी फोनवर बोलताना, असे काही प्रश्न होते, ते अजूनही अनुत्तरितच आहेत. पुणे पोलिसांनी किरण गोसावी विरोधात ‘लूक आऊट’ नोटीसही काढलेले आहे, मात्र त्याने अद्याप सरेंडर केलेलं नाही. शिवाय या प्रकरणा संबंधी चौकशीसाठी एनसीबीने बोलावल्यानंतरही तो हजर राहिला नसल्याचं कळतं.

‘आर्यन खान’ ड्रग्स प्रकरणात एवढं सगळं महाभारत झाल्यानंतर, आता या प्रकरणात प्रसिद्ध हॅकर मनीष भंगाळे यांची एन्ट्री झाली असून,मनीष भंगाळे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने, हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. ‘अलोक जैन आणि शैलेश चौधरी’ या दोघांनी मला एक नंबर दाखवला, जो आर्यन खानच्या नावाने सेव्ह होता, त्या नंबरच्या व्हाट्सअप बॅकअप चॅटमध्ये, छेडछाड करण्यासाठी, त्याचबरोबर पूजा ददलानी या नावाने सेव्हव असणाऱ्या नंबरचे कॉल डिटेल्स काढण्यासाठी, पाच लाख रुपयांची ऑफर केल्याचा खळबळजनक दावा हॅकर मनीष भंगाळे यांनी केला आहे.

प्रसिद्ध हॅकर मनीष जैन यांनी, या संदर्भात गृहखात्याला पत्र देखील लिहिले आहे, त्यांनी आपल्या सोबत घडलेल्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम दिला असून, प्रभाकर साईलच्या जीविताला धोका असल्याचं देखील लिहिले आहे. आर्यन खानच्या नावाने सेव्ह असणाऱ्या, त्याचबरोबर पूजा ददलानी नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरच्या कॉल डिटेल्स आणि ‘व्हाट्सअप चॅटमध्ये’ छेडछाड करण्याचं मला सांगण्यात आलं होतं. त्यासाठी मला पाच लाख रुपयांची ऑफरही केली गेली, आणि दहा हजार अँडव्हान्स म्हणूनही देऊ केले होते. असंही भंगाळे यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर ‘प्रभाकर साईल’ नाव असणारं दुसरं एखांदे सिम कार्ड आपल्याला मिळेल का? असं देखील त्यांनी विचारण्यालं. अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोघांनी जाताना मला एक नंबर दिला, जो ‘ट्रू-कॉलर’वर सॅम डिसूजा या नावाने सेव्ह आहे. त्याचबरोबर तुम्ही जळगावला काय करताय? मुंबईला या, तिथे आमच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांसोबत ओळखी आहेत. भरपूर पैसे कमवू शकता, असं देखील त्यांनी मला सांगितलं. असाही दावा मनीष जैन यांनी, एका माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.