सातारा: शंभूखेड गावावर शोककळा; शहीद सचिन काटेवर आज होणार अंत्यसंस्कार

0

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवान शहीद होण्याच्या संख्येत वाढ झाल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियावर वाचल्या असतील ऐकल्या असतील. जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती असल्याचे पाहिला मिळते. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये सतत होत असणाऱ्या चकमकीत भारतीय जवान देखील शहीद होत आहेत.

मात्र राजस्थानमध्ये देखील माण तालुक्यातील ‘शंभूखेड’ या गावाचा तरुण देशसेवा बजावत असताना, बुधवारी शहीद झाल्याची बातमी कळती आहे. या घटनेने संपूर्ण माण तालुक्यात शोककळा पसरली असून, प्रत्येक जण हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. सचिन विश्वनाथ काटे असं या वीरमरण आलेल्या जवानाच नाव असून गेल्या पाच वर्षांपासून तो देशसेवा करत होता.

शहीद जवान सचिन काटे याचा छोटा भाऊ देखील सेनेने भरती झाला असून, तो सध्या आसाम या ठिकाणी भारत मातेची सेवा करत आहे. बुधवारी 20 ऑक्टोंबरला रात्री सचिन काटे देशसेवा करत असताना शहीद झाल्याची बातमी त्याचा छोटा भाऊ रेवन काटे याला राजस्थानमधील लष्कराच्या पथकाने दिली असल्याची माहिती मिळते.

सचिन काटेच्या पश्चात त्याचे,आई वडील आणि सध्या आसाम या ठिकाणी देशसेवा करत असलेला छोटा भाऊ रेवन काटे असा परिवार आहे. आई-वडील सध्या गावाकडे शेती करतात. देश सेवा करत असताना वीर मरण प्राप्त झालेला शहीद सचिन काटे याच्यावर आज शंभूखेड या गावात ‘अंत्यसंस्कार’ होणार आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.