नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कमा नये, राणेंच्या या वाक्याने राजकारण तापलं

0

दोन आक्टोंबरला कार्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहिला मिळालं. आर्यन खानला झालेली अटक ही, राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. इतर नवाब मलिक यांनी आर्यन खानला अटक करणारा अधिकारी समीर वानखेडे हा बोगस माणूस असून येणाऱ्या काळात लवकरच त्याला जेलमध्ये ही टाकलं जाईल असं वक्तव्य केलं आहे.

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व्हेकेशनसाठी मालदीव या ठिकाणी गेले असताना, समीर वानखेडे देखील मालदीवला गेला होता. बॉलिवूड सेलिब्रिटींची वसुली करण्यासाठी समीर वानखेडे हा मालदीवला गेला होता असा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे. तो पैशासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करत असल्याचा आरोप देखील आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

पूर्वीदेखील समीर वानखेडे यांनी सिंग राजपूत आत्महत्या नंतर रिया चक्रवर्तीवर ड्रग्स प्रकरणात खोटा गुन्हा दाखल केला होता. टार्गेट याचा बापही बोगस होता. हा देखील बोगस आहे. आणि याचे कुटुंबही बोगसच असल्याचा मोठा आरोप नवाब मलिक त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या या आरोपावरून आता राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे, नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे, यांनी ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांना टार्गेट करत असतात.

“नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कमा नये”, असा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्याचबरोबर निलेश राणे पुढे म्हणाले, नवाब मलिक ड्रग्सचं उघडपणे समर्थन करतोय, कारण ह्याचा जावई ड्रग्स सकट पकडला गेला आहे. असा एकेरी भाषेचा वापर करत निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्या बरोबरच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना निलेश राणे म्हणताहेत, “एक अधिकारी जो ड्रग्स नेक्सस तोडतोय, त्याला राज्य सरकारचा एक मंत्री जेल मध्ये टाकायच्या धमक्या देतो, NCP आणि पवार गप्प आहेत. पुढच्या पिढीचा विचार करा” जोरदार टीका नितेश राणे यांनी केल्यानंतर आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.